नवी दिल्ली 21 डिसेंबर : अनेकदा लोक काहीही कारण नसताना आपल्या आसपास असलेल्या छोट्या जीवांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना असं वाटतं की हा लहान जीव त्यांचं काहीच वाईट करू शकत नाही. मात्र अनेकदा तुम्ही हे ऐकलं असेल की विनाकारण कोणालाही त्रास देऊ नये, कारण अनेकदा समोरचा असा पलटवार करतो, ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. असंच काहीसं सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Viral Video on Social Media) पाहायला मिळालं. यात दिसतं की एका महिलेला कोंबड्यासोबत मस्ती करणं इतकं महागात पडलं की शेवटी तिलाच स्वतःला वाचवण्यासाठी तिथून धूम ठोकावी लागली (Chicken Attacked on Woman).
जबरदस्त! एका उडीतच मांजराने पार केली भलीमोठी नदी; VIDEO पाहून IAS अधिकारीही थक्क
व्हिडिओमध्ये एक महिला कोंबड्याला त्रास देताना दिसते. मात्र इतक्यात कोंबड्यानी असं काही केलं ज्याचा विचारही या तरुणीने केला नसेल. हे पाहून समजतं की लहान जीवही असं काही करू शकतात की भल्याभल्यांना घाम फुटतो. महिलेनं कधी विचारही केला नसेल की कोंबडा तिला इतकं घाबरवेल. ही संपूर्ण घटना तिथेच उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच व्हायरल झाला.
View this post on Instagram
व्हायरल होणारा हा व्हिडिओ demibagby नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केला गेला आहे. या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक यावर मजेशीर कमेंट करत आहेत. काहींनी महिलेची मस्करी केली आहे तर काहींनी कोंबड्याचं कौतुक केलं आहे. एका यूजरने लिहिलं, असं करणाऱ्या लोकांसोबत असंच घडायला हवं. इतरही अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.
हा कुत्रा आहे की चित्ता? वेग पाहून लागेल वेड, पाहा VIDEO
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला मजेतच कोंबड्याला घाबरवण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला असं वाटतं की ही महिला कोंबड्याला चांगलंच घाबरवेल. मात्र, इतक्यात कोंबड्याचा राग पाहायला मिळतो. हा कोंबडा हल्ला करण्यासाठी महिलेच्या मागे धावू लागतो. कोंबड्याचं हे रूप पाहून महिला जीव मुठीत घेऊन इथून पळ काढते. हा व्हिडिओ मजेशीर आहे, मात्र सोबतच हेदेखील शिकवतो, की विनाकारण लहान जीवांना त्रास देण्याचे काय परिणाम होऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.