जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रस्त्याच्या मधोमध येत 3 सिंहांनी अडवला पर्यटकांचा रस्ता अन्..; पाहा Viral Video

रस्त्याच्या मधोमध येत 3 सिंहांनी अडवला पर्यटकांचा रस्ता अन्..; पाहा Viral Video

रस्त्याच्या मधोमध येत 3 सिंहांनी अडवला पर्यटकांचा रस्ता अन्..; पाहा Viral Video

Lion Viral Video: व्हिडिओमध्ये गाड्यांच्या एका समूहाला थांबावं लागल्याचं पाहायला मिळतं. कारण रस्त्यावर दोन सिंह आपली शेपटी हालवत आराम करत आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 21 डिसेंबर : वन्यजीव (Wildlife) किंवा प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक रूपात पाहणं नेहमीच आनंददायी असतं. सध्या याच्याशी संबंधित एक व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच लोकप्रिय होत आहे आणि तो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की हा व्हिडिओ खरोखरच अतिशय सुंदर आहे. या व्हिडिओमध्ये (Viral Video of Lion) तीन अत्यंत धोकादायक दिसणारे सिंह अतिशय शांतपणे जमिनीवर पडलेले आणि विश्रांती घेत असल्याचं पाहायला मिळतं. हा कुत्रा आहे की चित्ता? वेग पाहून लागेल वेड, पाहा VIDEO व्हिडिओमध्ये गाड्यांच्या एका समूहाला थांबावं लागल्याचं पाहायला मिळतं. कारण रस्त्यावर दोन सिंह आपली शेपटी हालवत आराम करत आहेत. काही वेळातच आणखी एक तिसरा सिंह येथे पोहोचतो आणि आधीपासूनच रस्त्यावर झोपलेल्या दोन सिंहांमध्ये सामील होतो. हे मनमोहक दृश्य पाहण्याची सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळे इथे फिरायला आलेल्या ज्या पर्यटकांनी हे दृश्य पाहिलं, ते आपला हा अनुभव कधीच विसरणार नाहीत.

जाहिरात

18 डिसेंबरला पोस्ट केल्या गेलेल्या या 10 सेकंदाच्या व्हिडिओला बातमी देईपर्यंत 12 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, 43,000 हून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. 5800 हून अधिकांनी व्हिडिओ रिट्विटही केला आहे. ट्विटरवर या व्हिडिओला भरपूर पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

OMG! घोडाही असं करू शकतो? आईसमोरच पिल्लाला जिवंत गिळलं; Shocking Video Viral

एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, तिथे गेला, पाहिलं. आळशी लोकांमध्ये सेन्स ऑफ ह्यूमर असतो. दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, ओह, मला हे खूप आवडलं. आणखी एकाने सिंहाचं हे वागणं घरातील मांजरीप्रमाणे असल्याचं म्हटलं. तर आणखी एकाने कमेंट करत म्हटलं, “जंगल के बादशाह.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात