मराठी बातम्या /बातम्या /Viral /

व्यायामाची अशी पद्धत तुम्ही कधीच पाहिली नसेल; कपलचा हा VIDEO पाहून व्हाल थक्क

व्यायामाची अशी पद्धत तुम्ही कधीच पाहिली नसेल; कपलचा हा VIDEO पाहून व्हाल थक्क

एका कपलचा मजेशीर व्हिडिओ (Funny Video of Couple) आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, सोबतच खरंच असं होऊ शकतं का, या विचारात तुम्ही पडाल.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 03 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) तुम्ही सक्रीय असाल तर दररोज नवनवे व्हिडिओ (Trending Videos) तुम्हाला पाहायला मिळतात. काही घटना या नकळत कॅमेऱ्यात कैद झालेल्या असतात तर काही लोकांनी प्रसिद्धीझोतात येण्यासाठी स्वतःच मजेशीर व्हिडिओ रेकॉर्ड (Funny Video) करून ते शेअर केलेले असतात. असे व्हिडिओ पाहता पाहता व्हायरलही होतात. असाच एका कपलचा मजेशीर व्हिडिओ (Funny Video of Couple) आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, सोबतच खरंच असं होऊ शकतं का, या विचारात तुम्ही पडाल.

कुत्र्याला बेदम मारहाण करून केली हत्या आणि मग..; तरुणाच्या अमानुष कृत्याचा VIDEO

काही लोकांनी एक्सरसाइज (Exercise) करणं आवडतं. तर, काही लोक आळशीपणामुळे यापासून नेहमीच दूर राहतात. एका महिलेसोबतही असंच काहीसं झालं. मात्र, तिच्या पतीनं जे केलं ते पाहून सगळेच हैराण झाले. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती आपल्या पत्नीला एक्सरसाइज करण्यासाठी सांगतो. मात्र, ती तयार होत नाही. यानंतर पती डोकं चालवतो आणि खिशातून काही पैसे काढतो. पैसे पाहताच ही महिला व्यायाम करण्यास सुरुवात करते. हा व्यक्ती आपल्या तोंडामध्ये पैशाची नोट ठेवतो आणि त्याची पत्नी व्यायाम करत हे पैसे त्याच्याकडून घेते.

स्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका

व्हिडिओ पाहून तुम्हीही विचार करत असाल, की पैशासाठी माणूस काहीही करू शकतो, ही म्हण इथे खरी होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ (Instagram Video) jaat_k_jokes नावाच्या अकाऊंटवरून शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो जणांनी पाहिला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.

First published:

Tags: Couple, Funny video, Social media, Types of exercise