Home /News /viral /

कुत्र्याला काठीनं बेदम मारहाण करून केली हत्या आणि मग...; तरुणाच्या अमानुष कृत्याचा VIDEO VIRAL

कुत्र्याला काठीनं बेदम मारहाण करून केली हत्या आणि मग...; तरुणाच्या अमानुष कृत्याचा VIDEO VIRAL

युवकानं प्रथम कुत्र्याला नावेला बांधलं आणि नंतर काठीने त्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या (Dog Brutally Beaten To Death In Kerala) केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Brutal Video Viral) झाला आहे

    नवी दिल्ली 03 जुलै : केरळमध्ये (Kerala) काही तरुणांनी लेबरा कुत्र्याची हत्या केली आहे. त्यांनी प्रथम कुत्र्याला नावेला बांधलं आणि नंतर काठीने त्याला बेदम मारहाण करून त्याची हत्या (Dog Brutally Beaten To Death In Kerala) केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Brutal Video Viral) झाला आहे. मात्र, कुत्र्यांसोबत अमानुष कृत्य केल्याची ही पहिली घटना नाही. अलीकडेच पंजाबच्या पटियालामध्ये दोन महिलांनी एका निर्दोष मुक्या प्राण्याचा जीव घेतला होता. या महिलांनी त्याला स्कूटीला बांधलं ओढत नेलं होतं, यातच त्याचा मृत्यू झालेला. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ट्विटरवर लोक असं करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. सुधारगृहातील एग्जॉस्ट फॅनच्या छिद्रातून देह विक्रय व्यवसायातील 10 तरुणींचं पलायन हा व्हिडिओ ट्विटरवर @arun_8778 नावाच्या अकाऊंटवरुन 30 जून रोजी शेअर केला गेला आहे. यूजरनं व्हिडिओ (Heartbreaking Video of a Pet Dog) शेअर करत सांगितलं, की हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ ब्रूनो नावाच्या एका पाळीव कुत्र्याचा आहे. या कुत्र्याचा केरळच्या त्रिवेंद्रममध्ये मारहाण करून जीव घेण्यात आला. विज्हिंजम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली आहे. मात्र, अजूनही एफआयआर किंवा कोणालाही अटक झालेली नाही. PETA नं (People for the Ethical Treatment of Animals) या प्रकरणावर ट्विट करत सांगितलं, की कुत्र्याचे संरक्षक, काही स्थानिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांच्या तक्रारीच्या आधारे विज्हिंजम पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आलं आणि तिन्ही दोषींना अटक करण्यात आली आहे. या एक मिनिट ३१ सेकंदाच्या क्लिपमध्ये पाहायला मिळतं, की काळ्या रंगाच्या एका कुत्र्याला नावेला बांधलं गेलं आहे. हा कुत्रा हवेत लटकलेला आहे आणि एक व्यक्ती त्याला काठीने मारहाण करत आहे. याचदरम्यान कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, या व्यक्तीनं मृत्यूनंतरही कुत्र्याला काठीनं बेदम मारहाण केली आहे. प्रेयसीच्या पतीसह रात्रभर रिचवले दारूचे पेग; ....असा रचला हत्येचा कट लोकांनी ब्रूनोला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. ‘स्ट्रीट डॉग्स ऑफ बॉम्बे’नं इन्स्टाग्रामवर या घटनेचे काही फोटो शेअर केले आहेत. यासोबतच लिहिलं आहे, की या तिघांना शिक्षा मिळायला हवी की जामिनावर सोडायला हवं? सुनील (20), सिल्वेस्टर (22) आणि एक 17 वर्षांचा तरुण गुन्हेगार आहेत. त्यांना आता अटक करण्यात आली आहे. सतरा वर्षीय युवकानं व्हिडिओ काढला होता. त्यांनी ब्रनोचा मृतदेह समुद्रात फेकला आहे. त्यामुळे, मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Dog, Kerala, Shocking video viral

    पुढील बातम्या