मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

स्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा थरारक VIDEO

स्थानिकांच्या धाडसामुळं चिमुकलीला जीवदान, वाहून जाणाऱ्या मुलीची अशी केली सुटका, पाहा थरारक VIDEO

पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या एका चिमुकलीचा जीव दोन स्थानिकांच्या धाडसामुळं वाचला. त्यांनी पाण्यात उडी घेऊन वाहून जाणाऱ्या चिमुकलीचा जीव वाचवला.

पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या एका चिमुकलीचा जीव दोन स्थानिकांच्या धाडसामुळं वाचला. त्यांनी पाण्यात उडी घेऊन वाहून जाणाऱ्या चिमुकलीचा जीव वाचवला.

पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या एका चिमुकलीचा जीव दोन स्थानिकांच्या धाडसामुळं वाचला. त्यांनी पाण्यात उडी घेऊन वाहून जाणाऱ्या चिमुकलीचा जीव वाचवला.

  • Published by:  desk news

अनिस शेख, प्रतिनिधी

पुणे, 2 जुलै : कोरोनाची दुसरी लाट (Second wave of corona) ओसरत असली तरी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांहून खाली आला नाहीये. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन बंदीचे आदेश लागू केले आहेत. पुणे जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून काही पर्यटनस्थळं (Tourist Spots) बंद (Closed) ठेवण्यात आली आहेत. तरीही ही बंदी झुगारून अनेक पर्यटक पावसाळी सहली काढत असल्याचं चित्र आहे. मावळ तालुक्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत चार पर्यटकांचा मृत्यू (Four tourists died) झाला आहे, तर दोघांना वाचवण्यात (Two saved) ग्रामस्थांना यश आलं आहे.

२८ जून रोजी सेल्फीच्या नादात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला तर दहा वर्षांच्या चिमुकल्याला सुखरूप वाचविण्यात ग्रामस्थांना यश आलं. त्यानंतर 1 जुलै रोजी वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यातील कुसगाव येथे असलेल्या दगडाच्या खाणीत बुडून पिंपरी चिंचवड येथील दोघांचा मृत्यू झाला.

शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तळेगाव येथील कुंड मळ्यावर आई-वडिलांची नजर चुकवून गेलेल्या आणि पाय घसरुन पाण्यात पडलेल्या आठ वर्षीय शुभ्रा पिसाळ हिला वेळीच मदत मिळाल्याने तिचा जीव वाचला आहे. मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळावर मागील आठ दिवसात चौघांचा मृत्यू तर दोघांना सुखरूप वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.

हे वाचा - अखेर आंबिल ओढ्याच्या कारवाईवर अजित पवारांनी सोडलं मौन

अशी वाचली शुभ्रा

पर्यटन बंदी असतानाही पुण्यातून तळेगाव येथील कुंड मळ्यावर पर्यटनासाठी आपल्या आई-वडिलांसोबत आलेल्या आठ वर्षीय शुभ्राने आईवडिलांची नजर चुकवून वाहत्या पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु पाय घसरुन ती पाण्यात पडली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शुभ्रा पाण्यात वाहू लागली. तिच्या आईवडिलांनी मदतीसाठी आरडाओरडा करायला सुरुवात केली.  वाहून चाललेल्या मुलीला पाहून तय्यब शेख तसेच सचिन चव्हाण या दोघांनी पाण्यात उडी टाकली आणि शुभ्राला सुखरूप बाहेर काढलं. शुभ्राला वाचवल्यानंतर मात्र पाण्याबाहेर येण्यासाठी वाट मिळत नसल्याने पाण्याच्या मध्यावर असलेल्या एका खडकावरून तिघेही मदतीसाठी थांबले आणि इतरांकडे मदत मागू लागले. मग कुंडमळा येथील बजरंग दलाच्या तरुणांनी लोखंडी शिडीच्या मदतीनं संकटात सापडलेल्या शुभ्रा, तय्यब आणि सचिन या तिघांचीही सुटका केली.

मावळात पर्यटन बंदीच्या शासनाच्या आदेशाला झुगारून अनेक पर्यटक जीव धोक्यात घालून पर्यटन करत आहेत. त्यामुळे अवघ्या आठ दिवसात चौघांचा मृत्यू झाला असून सुदैवाने दोघांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे. नागरिकांनी बंदी असलेल्या पर्यटनस्थळी जाऊ नये, असं आवाहन करूनही नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालत असल्याचं चित्र जागोजागी दिसत आहे.

First published:

Tags: Tour, Viral video.