देह व्यापारासाठी ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीतील GB रोडवरुन पोलिसांनी 12 तरुणींची सुटका केली होती. मात्र त्यांना जिथं ठेवण्यात आलं होतं, तेथूनच तरुणी फरार झाल्या. तेथील एग्जॉस्ट फॅन तोडून तरुणींनी तेथून पळ काढला. आता पुन्हा त्या तरुणींना पकडण्यासाठी दिल्ली पोलीस प्रयत्न करीत आहे. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी त्यांच्या नावासह फोटो वृत्तपत्रात छापला आहे.