मुंबई, 28 जुलै : कपल बऱ्याचदा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. तिथे ते रोमँटिक क्षणही एकत्र शेअर करतात. पण अनेकवेळा अशी प्रकरणे समोर आली आहेत ज्यात हॉटेलच्या खोल्यांमध्ये छुपे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. अशा प्रकारे जोडप्यांचे खाजगी क्षण चोरून व्हायरल करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचं देखील समोर आलं आहे. असंच काहीसं एका कपलसोबत घडलं, ज्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. पाण्यामध्ये कपलनं पार केली हद्द, वॉटरपार्कलाच बनवलं Oyo; घटनेचा Video Viral एक जोडपं एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले होते आणि प्रत्येक जोडप्याप्रमाणे त्यांनी हॉटेलच्या खोलीतील जिव्हाळ्याचे क्षणही शेअर केले, परंतु जेव्हा त्यांना समजले की त्यांचे रोमँटिक क्षण कोणी दुसरं देखील पाहात असावा. तेव्हा त्यांना धक्का बसला. डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, केली गेट्स आणि तिची मंगेतर क्रिस्टन कॅपरारो ऑगस्ट 2022 मध्ये अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील सिल्व्हर स्प्रिंग नावाच्या शहरात राहिले. त्याला तेथे दोन दिवस घालवावे लागले, म्हणून त्याने एअरबीएनबी कंपनीमार्फत हॉटेल बुक केलं. या कंपनीच्या हॉटेल्समध्ये अशी सुविधा आहे की लोक त्यांच्या घरांचे हॉटेलमध्ये रूपांतर करू शकतात, म्हणजेच लोक त्यांच्या घरात पाहुण्यांना रहायला जागा देऊ शकतात आणि पैसे आकारू शकतात. कायली आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं देखील तेच केलं. हॉटेलमध्ये राहताना बेडखाली नक्की फेका पाण्याची बाटली, तरच रहाल सुरक्षित, नक्की हा प्रकार काय? 23 तास ड्रायव्हिंग केल्यानंतर, जेव्हा ते एकमेकांना एकटे भेटले, तेव्हा हॉटेलतमध्ये त्यांनी रोमान्स केला. दोघे बाथरुम मध्ये होते आणि मग ते रूम मध्ये आले आणि टीव्ही ऑन केला आणि तिथेच बेडवर झोपले. तो झोपताच क्रस्टनची नजर छतावरील स्मोक डिटेक्टरकडे गेली. हॉटेल आणि इमारतींमध्ये स्मोक डिटेक्टर बसवण्याचे कामही क्रस्टन स्वतः करतो, त्यामुळे त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. अशा स्थितीत एका छोट्या खोलीत दोन डिटेक्टर बसवण्याचे कारण काय असू शकते, याचे त्याला आश्चर्य वाटले. त्याने डिटेक्टर तपासले आणि त्याला धक्का बसला. कारण हा एक छुपा कॅमेरा होता. बाथरूममध्येही असाच कॅमेरा बसवण्यात आला होता, ज्याने त्यांचे खासगी क्षण रेकॉर्ड केले होते.
हॉटेलमालकाला न जुमानता तो घाईघाईने दुसऱ्या हॉटेलमध्ये गेला आणि तेथे जाऊन त्याने पोलिसांना फोन केला आणि नंतर हॉटेल मालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. प्रकरण इथेच संपले नाही, पोलिसांनी घरावर छापा टाकला तेव्हा मोठे रहस्य उघड झाले. हॉटेलचे मालक ख्रिस्तोफर जे. गोईस हे आपल्या भावासोबत तेथे राहत होते. पोलिसांनी भावाच्या खोलीत जाऊन टीव्ही आणि अनेक गुप्त कॅमेरे जप्त केले. त्याने कायलीच्या खोलीतच नव्हे, तर इतर पाहुण्यांच्या खोलीतही कॅमेरा बसवला होता. त्यानंतर कळले की हा त्यांचा व्यवसाय आहे आणि ते हे व्हिडीओ विकतात. दोघांना तुरुंगात टाकण्यात आले आणि आता हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. या घटनेमुळे कपल खूप दुखावले गेले असून त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन झाल्याचे या जोडप्याने म्हटले आहे. ही घटना ते कधीही विसरू शकणार नाहीत आणि नेहमीच ते घाबरत राहतील.