वॉशिंग्टन, 03 फेब्रुवारी : जीवन-मृत्यू तसं कुणाच्याच हातात नाही. पण म्हणतात ना काळ आला होता वेळ नाही, तशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक व्यक्ती कारमध्ये असताना ती बेशुद्ध झाली आणि कारने पेट घेतला. कार आगीच्या विळख्यात होती तरी ही व्यक्ती बचावली आहे. इतक्या मोठ्या दुर्घटनेतून त्याचा जीव वाचणं हे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. हा चमत्कार नेमका काय आणि कसा झाला पाहुयात.
म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी. हेच या व्यक्तीसोबत घडलं. त्याच्यासाठी देवदूतच धावून आला आणि त्याचा जीव वाचवला. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता रस्त्यावर एक कार दिसते आहे. कारला आग लागली आहे. कारमधून धुराचे लोट बाहेर पडत आहेत. कारचा दरवाजा उघडा आहे. पण ड्रायव्हर कारच्या आतच आहे. तो बेशुद्ध झाला आणि कार पेटते आहे.
हे वाचा - हेअरकट करताना अचानक समोर आला 'मृत्यू', सलूनमध्ये भयंकर घडलं; Shocking Video
सुदैवाने एक पोलीस तिथून जात होता. त्याचं लक्ष त्या पेटत्या कारकडे गेलं. तो धावत कारजवळ गेला. कारच्या आत त्याने पाहिलं तर ड्रायव्हर बेशुद्ध होता. त्याच्या मदतीला आणखी एक व्यक्ती आली. दोघांनीही त्या व्यक्तीला कारमधून बाहेर काढण्यासाठी धडपड सुरू केली. कारला आग लागलेली असल्याने त्याला कारमधून बाहेर काढणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यांना बऱ्याच समस्या येत होत्या. किंबहुना त्यांच्याही जीव धोक्यात होता. तरी त्यांनी रिस्क घेतली आणि दोघांनी मिळून कसंबसं करून त्या ड्रायव्हरला कारबाहेर काढलं.
जसं ड्रायव्हरला कारबाहेर काढलं तशी आग भडकली. गाडीच्या पुढच्या बाजूला असलेली आग, मागच्या बाजूपर्यंत पोहोचली. जिथं ड्रायव्हर बसला होता तो भागही आगीच्या विळख्यात गेला. पोलिसाने आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतःलाही मृत्यूसमोर झोकून दिलं. आपल्या जीवाची बाजी लावत त्याने ड्रायव्हरला मृत्यूच्या दारातून खेचून बाहेर काढलं.
हे वाचा - तरुणींना पाहताच आऊट ऑफ कंट्रोल झाला रेडा; पुढे जे घडलं ते धक्कादायक; पाहा VIDEO
lvmpd इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. बर्निंग कारची ही थरारक घटना अमेरिकेच्या लॉस वेगासमधील असल्याचं सांगितलं जातं आहे.
View this post on Instagram
व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनी पोलिसाचं कौतुक केलं आहे. तुमची या व्हिडीओबाबतची प्रतिक्रिया आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Burning car, Car, Fire, Viral, Viral videos