मुंबई, 02 फेब्रुवारी : प्राण्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वाघ, सिंह, मगर अशा जंगली प्राण्यांप्रमाणेच बैल, म्हैस, रेडा, कुत्रा अशा माणसांच्या आसपास राहणाऱ्या प्राण्यांचेही खतरनाक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे प्राणी चवताळले तर जंगली प्राण्यांपेक्षा कमी नाहीत. अशाच एका रेड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तरुणींना पाहताच हा रेडा आऊट ऑफ कंट्रोल झाला आणि त्यानंतर पुढे जे घडलं ते धक्कादायक आहे. रेड्याने तरुणींसोबत असं काही केलं ज्याचा विचारही कुणी केला नसेल. व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. या रेड्याला झालं आहे तरी काय? असं तुम्हीही म्हणाला. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन तरुणी एका स्कूटीवर बसत आहेत. त्या पाठमोऱ्या दिसत आहेत. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक रेडा येताना दिसतो. रोड क्रॉस करून तो रस्त्याच्या त्या बाजूला असलेल्या तरुणींकडे जातो. हे वाचा - अरे बापरे! घोडा झाला ‘श्वान’; CCTV मध्ये भयंकर दृश्य कैद, VIDEO पाहूनच धडकी भरेल मागून रेडा येतो आहे, याची कल्पना या स्कूटीवरील तरुणींना नाही. त्यांचं तिकडे लक्षही नाही. त्यांना काही समजायच्या आत रेडा आपले पुढील दोन्ही पाय उचलतो आणि तरुणींवर चढतो. तरुणी कशाबसा रेड्याच्या तावडीतून सुटण्यासाठी स्कूटीवरून उतरून पळण्याचा प्रयत्न करतात. रेड्याच्या वजनाने स्कूटी खाली पडते, त्यासोबत त्या तरुणीही. तशा त्या तरुणी तिथून पळ काढतात. व्हिडीओ पाहताच आपल्यालाही धडकी भरते.
सुदैवाने रेड्याच्या अशा हल्ल्यात तरुणींना काही झाल्याचं दिसत नाही आहे. स्कूटी पडल्यानंतर आणि तरुणी बाजूला झाल्यानंतर रेडा शांत होतो आणि तिथून तो निघून जाताना दिसतो. तिथंच असलेल्या कुणीतरी आपल्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद केलं, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताच व्हायरल झाला आहे. हे वाचा - कर्माचं फळ! सापावर गोळ्या झाडल्या पण…; पुढच्याच क्षणी त्या व्यक्तीचाच खेळ खल्लास; खतरनाक VIDEO ही घटना कुठली आणि कधीची आहे माहिती नाही. challenger_raju_73 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.