जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हेअरकट करताना अचानक समोर आला 'मृत्यू', सलूनमध्ये भयंकर घडलं; Shocking Video

हेअरकट करताना अचानक समोर आला 'मृत्यू', सलूनमध्ये भयंकर घडलं; Shocking Video

सलूनमध्ये भयंकर घडलं.

सलूनमध्ये भयंकर घडलं.

सलूनमधील भयंकर दृश्य सलूनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 02 फेब्रुवारी : बऱ्याचदा असं काही घडतं ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सलूनमध्ये हेअरकट करताना असा अपघात झाला जो पाहूनच सर्वांना धडकी भरली आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सलूनच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सलूनमध्ये काही लोक केस कापत आहेत, तर काही दाढी करत आहेत. एक व्यक्ती सीटवर बसली आहे आणि आपला नंबर येण्याची प्रतीक्षा करत आहेत. पण आता काय होणार आहे, याचा यापैकी कुणीच स्वप्नातही विचार केला नव्हता. हे वाचा -  महिला पोलिसाने प्रवाशाला आधी मृत्यूच्या दारातून खेचलं, नंतर तिथंच त्याला…; रेल्वे स्टेशनवरील थरारक घटनेचा VIDEO सर्वकाही सुरळीत, शांत वाटतं आणि अचानक एक भरधाव कार सलूनमध्ये घुसते. सलूनमधील लोकांना काही कळायच्या आतच कार आत येते.

News18लोकमत
News18लोकमत

जशी कार येते तसे सर्वजण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करता. सीटवर बसलेली व्यक्ती या कारच्या अगदी समोर असते. तीसुद्धा पळते. पण पळून पळणार तरी कुठे ती कार सर्वांना उडवत जाते. सलूनमध्ये बाजूला असलेले लोक सुदैवाने बचावतात. पण सीटवर बसलेली व्यक्ती मात्र या कारखाली येते. ती व्यक्ती जिवंत आहे की नाही, याबाबत माहिती नाही. या व्हिडीओत काही दिसत नाही आहे. हे वाचा -  VIDEO - चालत्या ट्रेनने फरफटत नेलं, शेवटी…; रेल्वे स्टेशनवरील ‘ती’ भयानक 15 सेकंद सलूनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे भयंकर दृश्य कैद झालं आहे.  ही घटना कधीची आणि कुठली आहे माहिती नाही.  @ViciousVideos ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. धडकी भरवणारं दृश्य आहे, त्या व्यक्तीची चिंता वाटते आहे, मृत्यू कधीही येऊ शकतो, अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिल्या आहेत.

जाहिरात

हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला काय वाटलं? तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात