मुंबई, 07 मे : तसे पाहाता विमानाचा प्रवास हा इतर पर्यायांपेक्षा थोडा खर्चिक असतो. पण त्यामुळे कमी वेळात लांबचा प्रवास करता येतो, ज्यामुळे वेळेची बचत होते. सहसा ट्रेन या 24 तास, 48 तासात लोकांना गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवतात. पण विचार करा की फ्लाईटनेच एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला 20 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागला तर? विमानाबद्दल विचार केला तर, जगातील सर्वात लांब विमान प्रवास किती किलोमीटर करते? म्हणून आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगणार आहोत. तुम्हाला विमानाच्या एका प्रवासाबद्दल जाणून आश्चर्य वाटेल की, उड्डान करुन हे विमान सरळ सरळ समुद्र पार करुन दुसऱ्या भागात पोहोचू शकतो. परंतू हा प्रवास असा सरळ न करता विमान पूर्णपणे यू टर्न मारुन जातो, ज्यामुळे हा प्रवास जगातील सर्वात लांबचा प्रवास होतो. जगातील अशी ठिकाणं जेथे विमान उड्डाणावर बंदी, भारतातील ‘या’ भागाचाही समावेश हो हे खरं आहे, यूएस ते सिंगापूरला जाणारी फ्लाइट ही पूर्ण यूटर्न मारुन जातो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या मार्गावरून जाणारी उड्डाणे थेट मार्गावरून जात नाहीत. या मार्गावर विमानाने 15,300 किलोमीटरहून अधिक अंतर कापावे लागते. हे उड्डाण न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळ क्वीन्स येथून सुरु होतो आणि सिंगापूरमधील चांगी विमानतळावर थांबतो. हे अंतर कापण्यासाठी या फ्लाइटला 18 तास 50 मिनिटे लागतात. एका सरळ रेषेत पूर्वेकडे प्रवास करण्याऐवजी, फ्लाइट उत्तरेकडे जाते आणि मग तेथून यु टर्न घेऊन येते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का? …म्हणून विमानाच्या खिडकीवर दिला जातो लहान छिद्र, कारण ऐकून विचारात पडाल यामागचं कारण आहे सुरक्षित प्रवास. विमानं आशियाला जाणार्या उड्डाणे U-टर्न मार्ग स्वीकारणे पसंत करतात, कारण ते नकाशावरील सरळ रेषांपेक्षा सुरक्षित आणि जलद असतात. या फ्लाइटचा मार्ग दाखवणारा फोटो व्हायरल झाला आहे. तो पाहिल्यानंतर मात्र लोकांना हा प्रश्न सतावत आहे की सरळ प्रवास जास्त सोपा आहे. मग विमानं असं का करतात? मुनरो एरोस्पेसच्या म्हणण्यानुसार, “नकाशे काहीसे गोंधळात टाकणारे आहेत, कारण पृथ्वी गोलाकार आहे. याचा अर्थ थेट सरळ असलेले मार्ग दोन स्थानांमधील सर्वात कमी अंतर देऊ शकत नाहीत. तसेच सुरक्षिततेचा अभाव आणि आपत्कालीन लँडिंगची कमी शक्यता लक्षात घेता, आशियाला जाणारी उड्डाणे उत्तरेकडील वळण घेणं आणि पॅसिफिक महासागर टाळणे पसंत करतात आणि ते प्रवाशांच्या देखील फायद्याचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.