जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ...म्हणून विमानाच्या खिडकीवर दिला जातो लहान छिद्र, कारण ऐकून विचारात पडाल

...म्हणून विमानाच्या खिडकीवर दिला जातो लहान छिद्र, कारण ऐकून विचारात पडाल

सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

विमानाने प्रवास करत असताना आपल्याला प्रवाशी म्हणून त्याच्याशी संदर्भात संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. पण कधी तुम्ही विचार केलाय का की विमानाच्या खिडकीला एक छोटा होल का असतो?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : विमानाचा प्रवास हा अनेकांसाठी आता सोयीचा झाला आहे. कारण यामुळे लोकांचा वेळ वाचतो. फक्त हा थोडा खर्चिक आहे, ज्यामुळे तो सर्वांच्याच खिशाला परवडणारा नसतो. पण असं असलं तरी देखील आता सध्याच्या काळात विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की बहुतांश लोकांनी एकदा तरी विमानातून प्रवास केला असावा. तुम्हाला माहितीय का की विमानाने प्रवास करत असताना आपल्याला प्रवाशी म्हणून त्याच्याशी संदर्भात संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. पण कधी तुम्ही विचार केलाय का की विमानाच्या खिडकीला एक छोटा होल का असतो? चेकवर रक्कम लिहिल्यानंतर Only का लिहिलं जातं? हे आहे त्यामागील कारण आज आम्ही तुम्हाला फ्लाइटशी संबंधित अतिशय रंजक माहिती सांगणार आहोत. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. अनेक लोक याकडे फारसं लक्ष देत नाहीत पण ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, जर विमान उडत असताना बाहेरचा प्रेशर आत जाणवू नये म्हणून खिडक्या दरवाजे घट्ट बंद ठेवले जातात. पण मग असं असलं तरी विमानांच्या खिडक्यांना असा लहान छिद्र का दिला जातो? व्यावसायिक फ्लाइटच्या खिडक्यांना एक लहान छिद्र दिला जातो. या छिद्राला ‘ब्लीड होल’ म्हणतात. याला “ब्लीड होल” का म्हणतात आणि त्याचे कार्य काय आहे ते पाहू हे नाव ऐकताना तसे भीतीदायक वाटत आहे. परंतु ते चांगल्या कारणासाठी फ्लाइटच्या खिडक्यांमध्ये तयार केले आहे. खिडकीच्या चौकटीतील या छोट्या छिद्राला ‘ब्लीड होल’ म्हणतात. केबिनच्या आतून विमानाच्या खिडक्यांवर जो दबाव टाकला जातो, हा दबाव नियंत्रित करण्यास या छिद्राची मदत होते. सोर्स : गुगल

सोर्स : गुगल

बहुतेक व्यावसायिक विमानांच्या खिडकी काचेच्या बाह्य, मध्य आणि आतील थरांनी बनलेले असते. या प्रकरणात, प्रवाशांचे संरक्षण करताना खिडकीच्या बाहेरील स्तरावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे खिडकीची बाहेरची काच आधी फुटते. जे सहसा ऍक्रेलिकचे बनलेले असतात. तज्ज्ञांच्या मते विमानाच्या खिडकीच्या बाहेरील थर केबिन प्रेशरचे सर्व ताण सहन करतो. “अत्यंत दुर्मिळ” इव्हेंटमध्ये केबिनचा दाब राखण्यासाठी आतील थर तयार केला आहे. त्यामुळे प्रवाशांना बहुतांश वेळा या लहान छिद्रावर डोकं न ठेवून झोपण्याचा सल्ला दिला जातो.

News18लोकमत
News18लोकमत

हे लहान छिद्र हे सुनिश्चित करते की उड्डाणाच्या वेळी केबिनचा दाब फक्त बाह्य स्तरावर लागू होतो. अशा प्रकारे आपातकालीन परिस्थितीत मधला थर जतन केला जातो. जर तिन्ही आरसे छिद्रांशिवाय बंद केले असतील, तर केबिनचा दाब आतील थरावर जास्त असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात