advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / जगातील अशी ठिकाणं जेथे विमान उड्डाणावर बंदी, भारतातील 'या' भागाचाही समावेश

जगातील अशी ठिकाणं जेथे विमान उड्डाणावर बंदी, भारतातील 'या' भागाचाही समावेश

असे काही झोन जगभरात आहेत, जेथून कोणतंही विमान उडू शकत नाही आणि याला नो फ्लाय झोन म्हणून डिक्लेअर केलं गेलं आहे. हा नो फ्लाय झोन दोन प्रकारचा आहे. एक कायमस्वरूपी आणि दुसरा तात्पुरता.

01
दोन दिवसांपूर्वीच नेपाळ विमान अपघात घडला आहे. ज्याची जगभरात चर्चा आहे. हा अपघात का आणि कसा घडला यावर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. असं ही सांगितलं जातंय की ते चीनने मुद्दाम पाडलं असावं. पण ही फक्त संभाव्यता आहे. या मागचं खरं कारण समोर येईलच. पण आपण अशा भागांबद्दल जाणून घेऊ ज्या भागात विमान उडू शकत नाहीत.

02
कोणत्याही राष्ट्रीय किंवा इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी सरकार त्या ठिकाणाला काही काळ नो फ्लाय झोन म्हणून घोषित करते. पण जगात अशी काही ठिकाणे आहेत जी कायमस्वरूपी नो फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. ही ठिकाणं कोणती आहेत? चला पाहू

03
डिस्ने पार्क, कॅलिफोर्निया: जगभरातील लोकांमध्ये डिस्ने पार्क खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही कल्पना करू शकणार नाही इतकं हे ठिकाण मॅजीकल किंवा जादुई आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील या डिस्ने पार्कवरून विमानाच्या उड्डाणावर बंदी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 9/11 हल्ल्यानंतर डिस्ने पार्कची देखील सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला.

04
तिबेट: तिबेट हा जगातील सर्वात उंच प्रदेशांपैकी एक मानला जातो, या प्रदेशाची सरासरी उंची 16000 फूट आहे. या सुंदर जागेच्या हद्दीत उंच पर्वत असल्यामुळे या ठिकाणी विमान उड्डाण करण्यास मनाई आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे ठिकाण नो फ्लाय झोन म्हणून घोषीत केले गेले आहे.

05
माचू पिचू : जगातील सात आश्चर्यांमध्ये समाविष्ट असलेला पेरूचा माचू पिचू हा देखील नो-फ्लाय झोन आहे. हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे जे पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. हे ऐतिहासिक ठिकाण दक्षिण अमेरिकन देश पेरू येथे आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 2,430 मीटर उंचीवर उरुबांबा व्हॅलीच्या वरच्या टेकडीवर वसलेले आहे. हे ठिकाण त्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे, तसेच दुर्मिळ वन्यजीव आणि वनस्पती जीवनाची संख्या देखील येथेच आहे.

06
मक्का: इस्लाम धर्मातील सर्वात महत्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे मक्का. मक्का आणि विशेषत: पवित्र काबावरून कोणत्याही प्रवासी विमानाला उड्डाण करण्याची परवानगी नाही. हे हज यात्रेचे अंतिम गंतव्यस्थान आणि इस्लामिक विश्वासाचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

07
ताजमहाल: भारतातील आग्रा येथे असलेला ताजमहाल हा जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वात सुंदर वास्तुकलेचा वारसा आहे. ताजमहालचे महत्त्व लक्षात घेऊन युनेस्कोने 1983 मध्ये याला जागतिक वारसा स्थळ म्हणून नियुक्त केले. ज्यानंतर यावरुन विमान घेऊन जाण्यावर बंदी केली आहे. वृत्तानुसार, ताजमहाल आणि त्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेमुळे सरकारने 2006 मध्ये याला नो-फ्लाय झोन घोषित केले होते.

08
बकिंगहॅम पॅलेस: युनायटेड किंगडमचा बकिंगहॅम पॅलेस देखील नो फ्लाय झोन क्षेत्र आहे. हे ब्रिटीश शाही घराचे कार्यालय आणि प्रतीक आहे. ब्रिटनची राणी किंवा राजा येथे राहतो. राजवाडा आणि राजघराण्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे. जरी आता ब्रिटनमधील इतर अनेक ठिकाणे देखील या झोनमध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये 10 डाऊनिंग स्ट्रीट, संसदेची सभागृहे आणि यूकेच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान यांचा समावेश आहे.

09
बार्सिलोनाचे गावा क्षेत्रः बार्सिलोनाच्या गावा येथे स्थित एक क्षेत्र पर्यावरणाच्या दृष्टीने नो-फ्लाय झोन घोषित करण्यात आले आहे. अहवालानुसार, येथील वनस्पती आणि प्राणी फारच दुर्मिळ आहेत. हे लक्षात घेऊन तेथील हवा प्रदूषित होऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे. या भागात स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे घरही आहे.

10
या सगळ्याशिवाय जगात अनेक ठिकाणी नो फ्लाय झोनचा नियम तात्पुरता लागू केला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो की नो फ्लाय झोन म्हणजे ते क्षेत्र ज्यावर कोणत्याही प्रकारचे विमान, ड्रोन, हेलिकॉप्टर, लढाऊ विमान, यांच्या उड्डाणास मनाई आहे. सुरक्षेच्या दृष्टीने असे निर्णय घेतले जातात.

  • FIRST PUBLISHED :
  • दोन दिवसांपूर्वीच नेपाळ विमान अपघात घडला आहे. ज्याची जगभरात चर्चा आहे. हा अपघात का आणि कसा घडला यावर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. असं ही सांगितलं जातंय की ते चीनने मुद्दाम पाडलं असावं. पण ही फक्त संभाव्यता आहे. या मागचं खरं कारण समोर येईलच. पण आपण अशा भागांबद्दल जाणून घेऊ ज्या भागात विमान उडू शकत नाहीत.

    MORE
    GALLERIES