मराठी बातम्या /बातम्या /Viral /लॉकडाऊनमुळे बराच काळ घरात कैद राहिली चिमुकली; झाला गंभीर परिणाम, आता स्वतःचेच केस उपटते अन्...

लॉकडाऊनमुळे बराच काळ घरात कैद राहिली चिमुकली; झाला गंभीर परिणाम, आता स्वतःचेच केस उपटते अन्...

लॉकडाऊनच्या काळात (Lockdown Effect on Mental Health) तिचा तणाव इतका वाढला की तिनं स्वतःच्याच डोक्याचे केस उपटून काढले.

लॉकडाऊनच्या काळात (Lockdown Effect on Mental Health) तिचा तणाव इतका वाढला की तिनं स्वतःच्याच डोक्याचे केस उपटून काढले.

लॉकडाऊनच्या काळात (Lockdown Effect on Mental Health) तिचा तणाव इतका वाढला की तिनं स्वतःच्याच डोक्याचे केस उपटून काढले.

नवी दिल्ली 29 सप्टेंबर : कोरोना काळात (Coronavirus Pandemic) जवळपास प्रत्येक देशानं लॉकडाऊनची घोषणा केली होती. यानंतर प्रत्येकजण आपल्याच घरामध्ये बंद होता. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हा पर्याय अतिशय चांगला होता, मात्र अनेक लोकांसाठी घरातून बाहेर न पडणं हे अतिशय कठीण होतं. घरात राहून राहून अनेकजण तणावात आले आणि त्यांची मानसिक स्थिती बिघडू लागली. असंच काहीसं घडलं आठ वर्षाच्या एका चिमुकलीसोबत. लॉकडाऊनच्या काळात (Lockdown Effect on Mental Health) तिचा तणाव इतका वाढला की तिनं स्वतःच्याच डोक्याचे केस उपटून काढले.

आपले केस उपटून काढल्यामुळे आता या मुलीचा टक्कल झाला आहे. ब्रिटनच्या (Britain) ब्रिस्टल येथील एक आठ वर्षाची मुलगी एमेलिया लॉकडाऊनमुळे इतकी तणावात गेली की तिनं आपले केस ओढून उपटण्यास सुरुवात केली (8 Year Old Girl Rip out Hair in Lockdown) . हळूहळू ती टकली झाली. आता तिच्या डोक्यावर काहीच लांब केस बाकी आहेत. त्यामुळे आता घरातून बाहेर पडताना ती आपल्या डोक्यावर कापड बांधते.

इंजिनिअरिंगची कमाल! डोंगराखाली बोगद्यात सहा पदरी महामार्ग; वरून वाहतोय कालवा

एमेलियाची आई जेमा मैंसी हिनं पहिल्यांदा आपल्या मुलीला पापण्यांचे केस ओढताना पाहिलं. हे पाहून ती हैराण झाली. मिरर वेबसाईटसोबत बोलताना त्यांनी सांगितलं, की लॉकडाऊनमध्ये सुरुवातीला एमेलिया आपल्या पापण्यांचे (Eyelashes) केस ओढत असे. काही काळातच तिनं आपल्या सर्व पापण्या ओढून काढल्या. महिलेचं म्हणणं आहे, की लॉकडाऊनमध्ये शाळेत न गेल्यानं आणि आपल्या मित्र मैत्रिणींना न भेटल्यानं ती खूप तणावात होती. यामुळे तिला trichotillomania नावाच्या कंडीशनचा सामना करावा लागला. यात व्यक्ती स्ट्रेसमध्ये येऊन स्वतःचेच केस उपटू लागतो आणि तो स्वतःला असं करण्यापासून थांबवू शकत नाही.

महिलेनं सांगितलं, की सुरुवातीला एमेलियाच्याया वागण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. मात्र, जेव्हा त्यांनी पाहिलं की मुलीच्या पापण्याच संपल्या आहेत, तेव्हा चिंता वाढली. दुसऱ्या लॉकडाऊनपर्यंत ती आपल्या डोक्याचे केसही उपटू लागली होती. जेमानं सांगितलं, की कधीकधी ती आपल्या मुलीवर ओरडत असे आणि असं न करण्याचा सल्ला तिला देत असे. मात्र, ती आधीपासूनच स्ट्रेसमध्ये होती त्यामुळे जेमा तिला अधिक त्रास देऊ शकत नव्हती.

उलटी झालेली रिक्षा कशीबशी सरळ केली; पण पुढं असं घडलं की सर्वांचा उडाला गोंधळ

एमेलियानं आपल्या डोक्याचे केस ओढायला सुरुवात केलेली तेव्हा तिची केस लांब होते मात्र ओढून ओढून तिनं आपले केस अतिशय लहान केले. आता तिच्या डोक्यावर काहीच लांब केस शिल्लक आहेत. जेमानं सांगितलं, की एमेलियाच्या लक्षातही राहात नसे की ती आपले केस ओढत होती. आता तिनं आपल्या डोक्यावर जवळपास सर्वच केस उपटून काढले असल्यानं बाहेर जाताना ती आपलं डोकं कपड्यानं झाकून घेते.

First published:
top videos

    Tags: Lockdown, Mental health, Woman hair