शिवपुरी, 28 सप्टेंबर : एखादं वाहन चालकाशिवायच रस्त्यावर धावू लागलं तर काय होईल? 21 व्या शतकात असंही प्रोग्रॅमिंग केलेलं वाहन असू शकेल, असंही काही जण म्हणतील. मात्र, ते वाहन म्हणजे एका साधीसुधी ऑटोरिक्शा (auto rickshaw) असेल तर? असाच काहीसा प्रसंग गजबजलेल्या चौकात घडला आणि लोक आश्चर्यानं पाहत राहिले. याचा गंमतशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
रस्त्यावर पलटी झालेली रिक्षा पुन्हा सरळ उभी करण्याच्या प्रयत्न चालक करत असताना ही घटना घडली. मध्य प्रदेशातल्या शिवपुरीच्या माधव चौकात चालकाशिवायच ऑटो रिक्षा धावू (auto rickshaw running on road without driver ) लागली. हे बघून लोकांमध्ये घबराट पसरली. ऑटोचालकानं स्वतः ती थांबवण्यासाठी धाव घेतली. मात्र, तोही खाली पडला आणि रिक्षा चालतच राहिली. थोड्या वेळानं दुसऱ्या वाहनाला धडक दिल्यानंतर ही रिक्षा आपोआप थांबली, त्यामुळं सर्वांना हायसं वाटलं.
हे वाचा - SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 606 जागांसाठी मेगाभरती; ‘इतका’ मिळणार पगार
शहरातील माधव चौकात एक चालती ऑटोरिक्षा अचानक उलटली. यामुळं लोक मदतीसाठी तिथं पोहोचले. ऑटो चालकानं लोकांच्या मदतीनं पलटी झालेला ऑटो उचलला. मात्र, त्याचं इंजिन सुरूच असल्याचं कोणाच्याच लक्षात आलं नाही. हवेत फिरणाऱ्या त्याच्या चाकांकडेही कोणी पाहिलं नाही. परिणामी, ऑटो सरळ होताच ती चालकाविनाच.. खरं तर चालकालाच फरपटत रस्त्यावर धावू लागली. रस्त्यावर बरीच गर्दीही होती. स्वतःहून चालणारी ऑटो थांबवण्यासाठी चालक धावत निघाला. पण तो स्वत: या प्रयत्नात पडला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हे वाचा - PHOTOS: ‘मेरे पास माँ है’ सारा अली खानने परिधान केली हटके डिझाईनची साडी
मात्र, या दरम्यान सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. चालत्या ऑटोनं मोटारसायकलस्वारला धडक दिली आणि तो खाली पडला. त्याला किरकोळ दुखापत झाली.
रिक्षा अचानक एका बाजूला जाऊन उभ्या असलेल्या वाहनांना धडकून थांबली. यामुळं कोणत्याही प्रकारचा मोठा अपघात टळला. भर बाजारात ऑटोरिक्षा अशी चालत असल्याचं पाहून आधी लोक घाबरले. नंतर मात्र, सर्वजण हसत सुटले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.