काबूल, 16 ऑगस्ट : तालिबानी (Taliban) दहशतवाद्यांनी काबूलवर (Kabul)कब्जा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे (Afghanistan) राष्ट्रपती अशरफ गनी (Afghan President Ashraf Ghani) यांनीही देश सोडला आहे. अफगाणिस्तानला पुन्हा इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान जाहीर करण्याची तयारी तालिबानने सुरू केली आहे. तालिबान काबूलवर ताबा मिळवण्यास सुरुवात करत असताना नागरिकांनी पलायन करण्यासाठी विमानतळावर गर्दी केली. रविवारी संध्याकाळपासून नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनही हजारो नागरिकांची गर्दी विमानतळावर आहे. मुंबईतील लोकल ट्रेनप्रमाणे नागरिकांची देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर एकच झुंबड उडाली आहे. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सध्या अफगाणिस्तानमध्ये देशातून पळ काढण्यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ सुरु आहे. अशातच विमानतळ परिसरात गोळीबार करण्यात आल्याचीही माहिती आहे. सध्या काबूल विमानतळावरील परिस्थिती गंभीर आहे. विमानतळावर देश सोडण्यासाठी हजारो नागरिक जमले आहेत. काबूलवर ताबा मिळवल्याने विमानांची उड्डाणेही रद्द झाली. त्यामुळे विमानतळावर हजारो लोकांची गर्दी झाली आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे देशाबाहेर पडण्यासाठी हवाईमार्ग हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे.
काबूल इंटरनॅशनल एयरपोर्टवर (Kabul International Airport) आता कमर्शियल फ्लाइट्सची (Flights) उड्डाण थांबवण्यात आली आहेत. विमानतळावर गोळीबार होत आहे. मोठ्या संख्येनं नागरिक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता विमानांची उड्डाण थांबवण्यात आल्याने नागरिक आतच अडकून बसले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.