मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अशरफ गनी अफगाणिस्तान सोडलं, रात्री उशिरा Facebook पोस्ट करत सांगितलं देश सोडण्याचं कारण

अशरफ गनी अफगाणिस्तान सोडलं, रात्री उशिरा Facebook पोस्ट करत सांगितलं देश सोडण्याचं कारण

President Ashraf Ghani FB Post: देश सोडल्यानंतर आता अशरफ गनी यांनी स्वतः खुलासा केला आहे. या खुलासात त्यांनी अफगाणिस्तान का सोडावं लागलं हे सांगितलं आहे.

President Ashraf Ghani FB Post: देश सोडल्यानंतर आता अशरफ गनी यांनी स्वतः खुलासा केला आहे. या खुलासात त्यांनी अफगाणिस्तान का सोडावं लागलं हे सांगितलं आहे.

President Ashraf Ghani FB Post: देश सोडल्यानंतर आता अशरफ गनी यांनी स्वतः खुलासा केला आहे. या खुलासात त्यांनी अफगाणिस्तान का सोडावं लागलं हे सांगितलं आहे.

काबूल, 16 ऑगस्ट: अफगाणिस्तानचे (afghanistan) राष्ट्रपती अशरफ गनी (Afghan President Ashraf Ghani ) यांनी देश सोडला. त्यानंतर तालिबानी (Taliban) दहशतवाद्यांनी काबूल (Kabul)वर कब्जा मिळवला आहे. देश सोडल्यानंतर आता अशरफ गनी यांनी स्वतः खुलासा केला आहे. या खुलासात त्यांनी अफगाणिस्तान का सोडावं लागलं हे सांगितलं आहे. गनी यांनी फेसबूकवर पोस्ट (Facebook Post) करत देश सोडण्याचं कारण सांगितलं आहे.

अशरफ गनी यांनी रविवारी म्हटलं की, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबाननं प्रवेश केल्यानंतर आपण होणाऱ्या रक्तपातापासून वाचण्यासाठी देश सोडला. आपल्या फेसबूक पेजवर केलेल्या पोस्टमध्ये गनी म्हणाले की, एका कठिण निर्णयाचा सामना करावा लागला. ज्यात 20 वर्षांच्या युद्धानंतर लाखो काबूल रहिवाशांचे भवितव्य आणि शहराची सुरक्षा धोक्यात आली होती. ज्यात अगोदरच असंख्य लोक मारले गेले होते.

राष्ट्रपती भवन आणि देश सोडल्यानंतर गनी यांनी रात्री उशिरा फेसबूक पोस्ट केली.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, रक्तपातापासून वाचण्यासाठी मी विचार केला की देश सोडणं हा एकमेव पर्याय असेल. तालिबानी जे नंतर काबूलमधील राष्ट्रपती भवनात घुसले. तालिबान आता एक ऐतिहासिक परीक्षेचा सामना करत आहोत. तालिबाननं तलवार आणि बंदूकीच्या निर्णयात विजय मिळवला. आता आमच्या देशबांधवांचा सन्मान, समृद्धी आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल.

''भारताशी चांगले संबंध हवेत'', तालिबानकडून भूमिका स्पष्ट

पुढे ते लिहितात की, जर मी अफगाणिस्तानमध्ये थांबलो असतो तर मोठ्या संख्येनं लोक देशासाठी लढायला रस्त्यावर उतरले असते. सद्याची परिस्थिती पाहता असंख्य लोकांचा मृत्यू झाला असता. यात देशाची राजधानी काबूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते. आता तालिबान जिंकला आहे.

अशरफ गनी यांनी सध्या आपण कुठे आहोत याचा खुलासा केलेला नाही. न्यूज चॅनेल अल जझीराने गनीच्या वैयक्तिक अंगरक्षकाचा हवाला देत म्हटले की, गनी, त्यांची पत्नी, त्यांचे चीफ ऑफ स्टाफ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेजारील देश उज्बेकिस्तानच्या ताशकंदमध्ये आहेत.

First published:
top videos

    Tags: Afghanistan, Taliban