काबूल, 16 ऑगस्ट: काबूल (Kabul Airport) विमानतळावरुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विमानतळावर काही महिलांना गोळी मारल्याची माहिती समजतंय. ज्या महिलांनी हिजाब (कान, नाक आणि मान झाकून टाकणारा प्रकार) घातला नव्हता त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. दैनिक भास्करनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. दरम्यान तालिबाननं (Taliban) यासंदर्भात अजून स्पष्टीकरण दिलेलं नाही. काबूल विमानतळावर झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
गोळीबारानंतर (Firing) विमानतळावर एकच धावपळ झाली. याचा व्हिडिओही (Video) समोर आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबाननं केलेल्या गोळीबारानंतर अमेरिकनं सैन्यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
विमानतळावर 6 हजारांहून अधिक सैनिक तैनात करणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. सैनिक तैनात केल्यानं नागरिक सुरक्षित बाहेर पडू शकतील. सध्या काबूल विमानतळावरील परिस्थिती गंभीर आहे. विमानतळावर देश सोडण्यासाठी हजारो नागरिक जमले आहेत.
Afghanistan | All commercial flights are suspended at Hamid Karzai International Airport in Kabul, reads a statement. The statement calls on the people to avoid crowds at the airport: TOLONews
— ANI (@ANI) August 16, 2021
तालिबाननं काबूलमध्ये कब्जा केल्यानंतर संपूर्ण शहरात सफेद तालिबानी झेंडे दिसत आहेत. तालिबानी नेता सोशल मीडियावर जास्त सक्रिय दिसत असून ते शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानी नेता मुल्ला बरादर आपल्या साथीदारांसोबत आज काबूलमध्ये दाखल होईल. सध्या मुल्ला बरादर हा कतारमध्ये असल्याची माहिती आहे.
अफगाणिस्तान सोडल्यानंतर अशरफ गनींची FB Post, सांगितलं देश सोडण्याचं कारण
अफगाणिस्तानला पुन्हा इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान (आयइए) जाहीर करण्याची तयारी तालिबानने सुरु केली आहे. तालिबानने काबूलवर ताबा मिळवण्यास सुरुवात करत असताना नागरिकांनी पलायन करण्यासाठी विमानतळावर गर्दी केली. रविवारी संध्याकाळपासून नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आज सकाळी सुद्धा हजारो नागरिकांची गर्दी विमानतळावर आहे.
Another day begins in Kabul, a sea of people rushing into the Kabul airport terminal. #AFG pic.twitter.com/UekpGJ2MWd
— Jawad Sukhanyar (@JawadSukhanyar) August 16, 2021
सध्या अफगाणिस्तानमध्ये देशातून पळ काढण्यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ सुरु आहे. अशातच विमानतळ परिसरात रात्रभर गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. काबूलवर ताबा मिळवल्याने विमानांची उड्डाणेही रद्द झाली. त्यामुळे विमानतळावर हजारो लोकांची गर्दी झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Taliban