Home /News /videsh /

ऐकावं ते नवलच! चक्क माशांच्या कातडीपासून इथे तयार होतात कपडे

ऐकावं ते नवलच! चक्क माशांच्या कातडीपासून इथे तयार होतात कपडे

चीनमध्ये माशांच्या कातडीपासून कपडे तयार केले जातात. एका जमातीच्या अनेक पिढ्या माशांच्या कातडीपासून कपडे तयार करताहेत. एका पीढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ही कला गेली आहे.

    बीजिंग, 23 जानेवारी : चीनमधील एक अल्पसंख्याक जमात गेल्या अनेक वर्षांपासून पिढीजात काम करत आहे. गेल्या अनेक पिढ्या हा समाज माशांच्या कातडीपासून कपडे तयार करण्याचं काम करतोय. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ही अनोखी कला पोहोचली आहे. माशांपासून कपडे तयार करण्याची ही कला आताही या समाजातल्या तरुणांना अवगत आहे. माशांच्या कातडीपासून कपडे तयार करणारा चीन हा एकमेव देश आहे. या जमातीतले लोकच असे कपडे तयार करतात आणि तेच कपडे घालतातही! युविंग फिंग ह्या 68 वर्षाच्या महिला माशांच्या कातडीपासून आजही कपडे तयार करतात. त्यांना ही कला त्यांच्या आईकडून मिळाली आहे. कपडे तयार करण्यासाठी किती मासे लागतात एक कपडा तयार करण्यासाठी अनेक मासे लागत असल्याचं फिंग सागतात. महिलेचा एक कपडा तयार करण्यासाठी 50 मासे लागतात. तर पुरुषाचे कपडे तयार करण्यासाठी 56 मासे लागतात. माशांच्या कातड्यापासून तयार होणारे कपडे टिकाऊ आणि चांगले असल्याचं फिंग सांगतात. कोणत्या माशांपासून तयार करतात कपडे? सर्वच माशांच्या कातडीपासून कपडे तयार केले जात नाहीत. त्यासाठी खास माशांचा वापर होतो. सेममाई, माईक आणि सालमन या माशांच्या कातडीपासून कपडे तयार केले जातात. हेही पाहा - डोंगरावरून वाहतोय आगीचा धबधबा! काय आहे VIRAL VIDEO मागचं वास्तव? मात्र दिवसेंदिवस आता ही कला लोप पावत चालली आहे. हेजे प्रांतातील काही लोकच माशांपासून कपडे तयार करतात. कसे तयार करतात माशांपासून कपडे? माशांपासून कपडे तयार करण्याची कला केवळ काही लोकांनाच माहिती आहे. दिवसेंदिवस ही कला नाहीशी होत असल्याचं समोर आलं आहे.  माशांच्या कातड्यांपासून कपडे तयार करण्याचं काम कठीण आहे. सुरुवातीला माशांच्या कातडीला माशांपासून वेगळं केलं जातं. त्यानंतर ते कातडं सुकवलं जातं. कातडी नरम केली जाते. तब्बल एक महिना कातडीवर काम केलं जातं. त्यानंतर 20 दिवसांनी कातडी शिवून कपडे तयार केले जातात.  काही वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावरही माशांच्या कपड्याला मागणी येते. काही प्रसिद्ध ब्रँडसुद्धा त्यांच्या उत्पादनात माशांच्या कातडीचा वापर करतात. कला संपण्याची भीती यूविंग फिंग यांना माशांच्या कातडीपासून कपडे तयार करण्याची कला संपणार असल्याची भीती वाटते. कला जिवंत राहावी यासाठी फिंग यांनी स्थानिक महिलांना ही कला शिकवण्याचा संकल्प केला आहे. वाचा - मृत्यूच्या 7 वर्षानंतर या स्टारच्या गाड्यांचा लिलाव, किंमत ऐकून व्हाल थक्क मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी देहबोली इतरांनी शिकावी असं त्यांना वाटतं.  माशांची हालचाल समजण्याची कला अवगत करण्याची कलाही त्या इतरांना शिकवण्यास तयार आहे. ही कला शिकणं कठीण आहे. पण आपण ही कला अनेकांना शिकवण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अन्य बातम्या LIVE सामन्यातच कपलचा सुरू झाला रोमान्स, आधी केलं KISS आणि... मार्कांच्या बदल्यात सेक्सची मागणी, शिक्षकाच्या कृत्याने शिर्डीत खळबळ इनकम टॅक्समध्ये होऊ शकतो मोठा बदल! मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाची बातमी
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: China, Fish

    पुढील बातम्या