VIDEO डोंगरावरून वाहतोय आगीचा धबधबा! काय आहे VIRAL VIDEO मागचं वास्तव?

सोशल मीडियावर आगीच्या धबधब्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओला ट्विटरवर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे.

सोशल मीडियावर आगीच्या धबधब्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओला ट्विटरवर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे.

  • Share this:
    कॅलिफोर्निया, 21 जानेवारी:  सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओतून आगीचा धबधबा वाहत असल्याचं दिसतंय. डोंगराच्या कडेवरून हा आगीचा धबधबा वाहतोय. आगीच्या धबधब्याचा व्हिडीओ ट्विटवर शेअर करण्यात आला. त्यानंतर केवळ दोन दिवसात हा व्हिडीओ तब्बल 30 लाख लोकांनी पाहिला आहे. दिवसेंदिवस आगीचा धबधबा पाहाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होतेय. मात्र वेगानं व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आणि तो खरा आहे की खोटा, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. व्हायरल व्हिडीओमागचं तथ्य शोधण्याचा हा प्रयत्न. खरच आगीचा धबधबा आहे का? आगीच्या धबधब्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळं धबधबा पाहून लोकं आश्चर्य व्यक्त करताहेत. मात्र या आगीच्या धबधब्यावर अनेक जण प्रश्नही उपस्थित केले जाताहेत. आगीचा धबधबा जगात कुठे आहे का? व्हिडीओत दिसत असलेला असा धबधबा प्रत्यक्षात आहे का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. कारण आगीचा असा कोणताही धबधबा अस्तित्वात नाही आहे. व्हिडीओतील धबधबा पाण्याचा आहे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कॅलिफोर्नियातील एका धबधब्याचा आहे. हा वॉटर फॉल हॉर्सटेल फॉल या नावानं ओळखला जातोय. हा  धबधबा दर वर्षी फेब्रवारी महिन्यात दोन आठवड्यासाठी नारंगी आणि लाल रंगाचा होतो. सूर्याची किरणं जेव्हा सरळ रेषेत धबधब्यावर पडतात तेव्हा धबधबा लाल रंगाचा दिसतो. सूर्याची किरणं एवढी प्रखर असतात की धबधबा आगीसारखा दिसतो. कधी कधी तर धबधबा ज्वालामुखी सारखा दिसतो. आगीच्या धबधब्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल सोशल मीडियावर आगीचा हा धबधबा तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओला ट्विटरवर आतापर्यंत 3.8 लाख लोकांनी पाहिलं आहे. व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर दोन दिवसातच हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. येवढचं नाही तर हजारो लोकांनी व्हिडीओवर कमेन्टही दिल्या आहे. कसा होतो लाल रंगाचा धबधबा? फेब्रुवारी महिन्यात केवळ 2 आठवडेच हा धबधबा नारंगी आणि लाल रंगाचा होतो. काही मिनिटांसाठीच धबधब्याला लाल रंग मिळतो. संध्याकाळी आकाश मोकळं असेल तरच सूर्याची किरण धबधब्यावर पडतात आणि धबधबा लाल होतो. त्यामुळं आगीचा अशा कोणताही धबधबा नाहीये. सोशल मीडियावर आगीच्या धबधब्याचा व्हायरलं होणारा व्हिडीओ हा पाण्याचा आहे.  त्यामुळं तुम्हीही असा व्हिडीओ पाहिला असेल तर तो व्हिडीओ आगीचा नाही तर पाण्याचाच आहे. हा प्रकाशाचा नैसर्गिक खेळ आहे, हे नक्की! अन्य बातम्या साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, शिर्डी आणि पाथरीच्या वादाला नवं वळण आलिया भटच्या आईचं वादग्रस्त विधान, अफजल गुरुला म्हटलं ‘बळीचा बकरा’ लेकीच्या लग्नात आईचं झेंगाट! सप्तपदींआधीच जावयाच्या वडिलांसोबत गेली पळून
    First published: