मृत्यूच्या 7 वर्षानंतर या स्टारच्या गाड्यांचा लिलाव, किंमत ऐकून व्हाल थक्क

मृत्यूच्या 7 वर्षानंतर या स्टारच्या गाड्यांचा लिलाव, किंमत ऐकून व्हाल थक्क

अमेरिकेतील प्रसिद्ध हॉलिवूड स्टार पॉल वॉकर याच्या गाड्यांचा लिलाव करण्यात आला. त्याच्या मृत्यूनंतर 7 वर्षानंतर अलिशान गाड्यांचा लीलाव करण्यात आला आहे

  • Share this:

अमेरिका, 20 जानेवारी: अमेरिकेतील प्रसिद्ध हॉलिवूड स्टार पॉल वॉकर याच्या गाड्यांचा लीलाव करण्यात आला.  मृत्यूच्या 7 वर्षांनी त्याच्याकडील अलिशान गाड्यांचा लीलाव करण्यात आला आहे. भीषण अपघातात पॉल वॉकर याचा मृत्यू झाला होता.

21 गाड्यांचा लीलाव

हॉलिवूड स्टार पॉल वॉकर याच भीषण अपघातात 7 वर्षांपूर्वी निधन झालं होतं. निधनाच्या 7 वर्षानंतर त्याच्याकडे असलेल्या अलिशान गाड्यांचा लीलाव करण्यात आला आहे. त्याच्याकडे अलिशान अशा 21 गाड्या होत्या. त्या गाड्या कोट्यवधी रुपयांना विकल्या गेल्या आहेत.

कोणत्या गाडीला किती मिळाली किमत?

पॉल वॉकर याच्याकडे एका पेक्षा एक अशा अलिशान गाड्या होत्या. नव्या मॉडेलच्या गाड्या घेण्याची त्याला हौस होती.  त्यामुळं महागड्या गाड्या त्यानं खरेदी केल्या होत्या. त्याच्याकडे असलेल्या 21 गाड्या तब्बल 16 कोटी 56 लाख रुपयांना विकल्या गेल्या आहे. यातील BMW M3 लाईटव्हेट गाडी तर तब्बल 2 कोटी 73 लाखात विकली गेली आहे. ही गाडी फास्ट ऍन्ड फ्युरियस चित्रपटात वापरण्यात आली होती.

कसा झाला होता पॉल वॉकरचा मृत्यू?

30 नोव्हेंबरला पॉल वॉकर आपल्यागाडीतून जात होता. एका चॅरिटी कार्यक्रमासाठी तो गाडीनं निघाला होता. गाडीचा वेग प्रचंड होता. त्यामुळं त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्यावरील खांबाला आदळली. गाडीचा वेग जास्त असल्यानं गाडी खांबाला लागून झाडावर आदळली. या भीषण अपघातात पॉल वॉकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

बाल कलाकार म्हणून हॉलिवूडमध्ये एन्ट्री

पॉल वॉकर यानं बाल कलाकार म्हणून हॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. 70 व्या शतकात त्यानं हॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. मात्र त्याला ओळख निर्माण करण्यासाठी तब्बल 20 वर्ष लागली. 90च्या दशकातील टीव्ही शो 'द यंग एण्ड द रेस्टलेस' च्या माध्यमातून ते घरा-घरात पोहचले. त्यानंतर पॉल वॉकरनं 'शीज ऑल देट' आणि 'वर्सिटी ब्लूज' या चित्रपटात काम केलं. या चित्रपटातील त्याच्या कामाचं सर्वस्तरातून कौतुक करण्यात आलं. मात्र त्यांच्या अभिनयाला जगभरातून दाद मिळाली ती 'फास्ट एण्ड फ्युरियस' चित्रपटातून. त्याचा हा चित्रपट खुप गाजला. मात्र दुर्दैवीनं कार अपघातात त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा- 48 वर्षांनंतर अखेर कुटुंबीयांशी भेट, फेसबुक व्हिडीओमुळं चमत्कार

वजनदार कारवाई! 250 किलोच्या दहशतवाद्याला पोलीस व्हॅन पडली अपुरी

बॅंक अधिकाऱ्यांनेच केली तिजोरी रिकामी, घरच्या कपाटात लपवले 205 कोटी

First published: January 20, 2020, 4:18 PM IST

ताज्या बातम्या