Home /News /money /

इनकम टॅक्समध्ये होऊ शकतो मोठा बदल! मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाची बातमी

इनकम टॅक्समध्ये होऊ शकतो मोठा बदल! मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाची बातमी

येत्या 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2020) इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

  नवी दिल्ली, 22 जानेवारी :  येत्या 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2020) इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये (Income Tax slab) मोठा बदल होण्याची शक्यता आहे. CNBC आवाजला मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांचं उत्पन्न 20 लाखांपर्यंत आहे, त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitaraman) यांनी काही दिवसांपूर्वीच आयकर दरात कपात करण्याचे संकेत दिले होते. याविषयी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या होत्या की, आयकराचे दर तर्कसंगत करण्यासाठी उपाययोजना करत आहोत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के टॅक्स लावण्याचा प्रस्ताव आहे. सध्या 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर आकारला जातो. 7 ते 10 लाखांदरम्यान उत्पन्न असेल तर 10 टक्के कर आकारला जातो आणि 10 लाखांवर उत्पन्न असेल तर 30 टक्के इन्कम टॅक्स आहे. 20 लाख ते 10 कोटी उत्पन्न असणाऱ्यांना हा कर लावला जातो. यापेक्षा जास्त उत्पन्नावर 35 टक्के कर टॅक्स आकारला जातो. आता या टॅक्सच्या स्लॅब बदलू शकतात. यंदाच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे. 10 ते 20 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्के टॅक्स लावण्याचा सरकार विचार करत आहे. 30 ऐवजी 20 टक्के टॅक्स द्यावा लागला, तर या मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गीयांना थोडा दिलासा मिळू शकतो. सध्याच्या टॅक्स स्लॅबनुसार 2.5 लाखांच्या वर उत्पन्न असेल तर ते करपात्र उत्पन्न धरलं जातं. त्यापेक्षा कमी उत्पन्न असेल तर ते करमुक्त असतं. GST चे दर वाढणार ? 2019 मध्ये GST चे दर अनेक वेळा घटले आहेत. गृहनिर्माण, इलेक्ट्रिक वाहनं, हॉटेलमध्ये राहणं, हिरे उद्योग, आउटडोअर कॅटरिंग यावरचे GST चे दर वाढणार आहेत. देशाचा GDP घसरल्यामुळे अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. या सगळ्या स्थितीत सामान्य माणसाला करांबद्दल काही दिलासा द्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. सध्या 2.5 लाख रुपयांचं वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे. अडीच लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर 5 टक्के कर आहे. बजेटमध्ये काय महत्त्वाचं? इन्कम टॅक्स खेरजी GST, रोजगारीची आकडेवारी आणि प्रमुख 8 क्षेत्रांतलं उत्पादन या सगळ्या मुद्द्यांवर सरकार काय सुधारणा करतं त्यावरही आर्थिक प्रगतीचा दर अवलंबून आहे.त्यामुळे अर्थमंंत्री निर्मला सीतारामन यांना या मुद्द्यांवर लक्ष द्यावं लागणार आहे.
  अन्य बातम्या स्वप्न भंगणार! बाळासाहेबांचा पुतळा यंदा नाहीच, हा आहे वाद महाराष्ट्रात 'तान्हाजी' सिनेमा टॅक्स फ्री, बॉक्सऑफिसवर कमाईची घोडदौड सुरुच 'येवले'ची भेसळ उघड, चहामध्ये टाकत होता बंदी घालण्यात आलेला पदार्थ Special Report: साईबाबांनी बीडमध्ये केली होती नोकरी, काय सांगतात पुरावे?
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: Budget 2020

  पुढील बातम्या