Home /News /videsh /

VIDEO : ...म्हणून चीन Coronavirus ला हरवू शकला; लॉकडाउनमधलं वुहान कसं होतं एकदा पाहाच!

VIDEO : ...म्हणून चीन Coronavirus ला हरवू शकला; लॉकडाउनमधलं वुहान कसं होतं एकदा पाहाच!

आतापर्यंत जवळपास दीड कोटी लोकांनी पाहिलेला हा VIDEO हुबेई प्रांताची टाळेबंदी उठल्यानंतर हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. वुहानमध्ये क्वारंटाइनचे आणि टाळेबंदीचे किती कडक नियम आहेत पाहा..

    बीजिंग, 27 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Coronavirus ला हरवायचं असेल तर घरीच बसा असं पहिल्यांदा सांगून आठवडा उलटला. त्यानंतर देशभर 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. दोनच दिवसांत लोक लॉकडाउनला कंटाळले. चीनच्या ज्या प्रांतातून Coronavirus च्या साथीला सुरुवात झाली, तो प्रांत गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाउन होता. बुधवारीच तिथल्या सरकारने हुबेई प्रांताचा लॉकडाउन अंशतः हटवला आणि तिथल्या 6 कोटी लोकांनी मोकळा श्वास घेतला. हुबेई प्रांताच्या राजधानीचं शहर असलेल्या वुहानमधूनच या कोरोनाच्या साथीला सुरुवात झाली. हे वुहान शहर अद्यापही लॉकडाउन आहे. दिवसभरात 15, एकूण 77 : वुहानसारखं मुंबई होणार देशातलं कोरोनाव्हायरसचं केंद्र? पण आपल्याकडचा लॉकडाउन आणि वुहानमधला यात खूप फरक आहे, हे तिथून येणाऱ्या काही व्हिडीओंमधून दिसतं. असं आहे लॉकडाउन अनेक जण या लॉकडाउनला गंभीरपणे घेत नाहीत. पण इटली आणि स्पेनचे हाल पाहता भारताने लॉकडाउन गंभीरपणे घ्यायलाच हवा, कारण त्यानेच या साथीला आळा बसू शकतो. वुहानमध्ये असलेल्या काही जणांनी TikTok वर व्हिडीओ अपलोड केले आहेत. तिथे प्रत्येक घरातल्या एकाच व्यक्तीला एका वेळी बाहेर सोडतात तेही आठ दिवसांतून एकदा. एक फॉर्म भरल्याशिवाय त्यांना घराबाहेर पडता येत नाही, असं होम क्वारंटाइन असलेल्या एका व्यक्तीने सांगितलं. वुहानमधला प्रत्येक माणूस निरोगी असला तरी होम क्वारंटाइन आहे आणि भारतातही सध्या हाच नियम लावण्यात आला आहे. VIDEO : लॉकडाऊनमध्ये मशिदीत जाणं पडलं महागात, नमाजनंतर पोलिसांनी अशी केली धुलाई China Global Television Network (CGTN)या चीनमधल्या टीव्ही चॅनेलनं माध्यम समूहाने एक महिन्याच्या लॉकडाउनवर The lockdown: One month in Wuhan ही एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे. ती YouTube वर उपलब्ध आहे. आतापर्यंत जवळपास दीड कोटी लोकांनी पाहिलेला हा VIDEO हुबेई प्रांताची टाळेबंदी उठल्यानंतर हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. चीनने या साथीला आवर घालण्यासाठी कायकाय केलं. वुहानमधल्या डॉक्टरांनी, आरोग्य सेवकांनी कसं दिवसरात्र एक करत काम केलं आणि त्या देशाने किती अत्याधुनिक उपकरणं आणि सुरक्षाकवच या सेवकांना पुरवलं हे या व्हिडीओतून कळेल. पण त्याहीपेक्षा लॉकडाउनचे कडक निर्बंध तिथे घालण्यात आले होते आणि ते किती कसोशीने पाळले गेले हे यातून दिसेल. क्वारंटाइन सेक्शनचे कडक नियम कोरोनाव्हायरसच्या रुग्णांसाठी तिथे खास क्वारंटाइन सेंटर उभारण्यात आली आहेत. क्वारंटाइन सेक्शनमधलं शूटिंगही यात आहे. या क्वारंटाइन सेक्शनमध्ये डॉक्टरांनासुद्धा काहीही घेऊन जायची मनाई आहे. ते आपला फोनही आत घेऊन जात नाहीत. या वॉर्डमधली सहा तासांची शिफ्ट संपेपर्यंत जेवण-खाण अगदी वॉशरूमही वापरायची नाही, असं सांगण्यात आलेलं आहे. कारण त्यांना या क्वारंटाइन वॉर्डसाठी दिले गेलेले स्पेशल सूट प्रचंड महागडे आणि एकदाच वापरता येण्यासारखे आहेत. ट्रिपल प्रोटेक्शन असलेले हे सूट आणि तिहेरी संरक्षणाचे मास्क वापरून डॉक्टर आणि नर्सच्या अंगावर रॅश उठतात, वळही उठतात. पण त्यांना या सुरक्षा कवचाशिवाय आत जाऊ दिलं जात नाही. एखाद्या डॉक्टरची कुठली गोष्ट आत राहिली, तर ती विसरून जायची. या क्वारंटाइन सेक्शनमधली कुठलीही गोष्ट पुन्हा बाहेर येणार नाही, अशी सक्त व्यवस्था तिथे आहे, असं या व्हिडीओतून दिसतं. इटलीच्या पोलिसांचा VIDEO पाहिलात आता महाराष्ट्राच्या खाकी वर्दीची भावनिक साद बघा ही एवढी सुरक्षा वापरल्यामुळेच हा प्रांत आज कोरोनाव्हायरसवर मात करू शकला आहे. गेल्या 18 दिवसात या प्रांतात कुठलीही स्थानिक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली नाही. चीनमध्ये दाखल होत असलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आता बाहेरच्या प्रांतातले आणि देशातले आहेत. त्यामुळेच त्यांनी हा कडक निर्बंधांची टाळेबंदी उठवली आहे. अन्य बातम्या Big Announcement:जीवानावश्यक वस्तू आणि पदार्थांची दुकानं 24 तास सुरु राहाणार मुंबईच्या चाळीत पोहोचला Corona; या 4 रुग्णांमुळे परिस्थिती जाऊ शकते हाताबाहेर
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या