मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एक नंबर! इटलीच्या पोलिसांचा VIDEO पाहिलात आता महाराष्ट्राच्या खाकी वर्दीची भावनिक साद बघाच

एक नंबर! इटलीच्या पोलिसांचा VIDEO पाहिलात आता महाराष्ट्राच्या खाकी वर्दीची भावनिक साद बघाच

'जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो' महाराष्ट्र पोलिसाने लाठीकाठीशिवाय घातलेली ही भावनिक साद जरुर ऐका आणि काळजी घ्या.

'जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो' महाराष्ट्र पोलिसाने लाठीकाठीशिवाय घातलेली ही भावनिक साद जरुर ऐका आणि काळजी घ्या.

'जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो' महाराष्ट्र पोलिसाने लाठीकाठीशिवाय घातलेली ही भावनिक साद जरुर ऐका आणि काळजी घ्या.

    मुंबई, 26 मार्च : कोरोना व्हायरस चीनमधून जगभरात पसरला. या व्हायरसमुळे जगातील अनेक देशांवर लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा 15 हजारांपेक्षा जास्त झाला आहे. तर तीन लाख लोक याच्या विळख्यात सापडले आहेत. संसर्गजन्य असलेल्या या आजारावर सोशल डिस्टन्सिंग हाच उपाय आहे. यामुळे सरकार आणि प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडू नये असं सांगितलं आहे. भारतात बुधवारी मध्यरात्रीपासून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीही काही लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी पोलिसांना अशा नागरिकांना समजावून सांगताना कठोर पावलं उचलावी लागत आहेत. काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचाही वापर केला आहे. मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एका पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये लाठीचा वापर न करता अभिनव पद्धतीनं नागरिकांना आवाहन केलं आहे. बदलापूर हायवेवरील हा व्हिडि व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलिस अधिकारी गाणं म्हणताना दिसत आहे. जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो असं गाणं म्हणत पोलिस अधिकारी रस्त्यावर उभा आहे. देशभरात जवळपास सर्वच शहरांमध्ये, महामार्गावर पोलिसांचा फौजफाटा आहे. हे वाचा : लॉक डाऊनमध्ये बीचवर गेलेल्या तरुणांना पोलिसांनी हेलिकॉप्टर आणून पकडलं अत्यावश्यक सेवा वगळता इतर काऱणासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन केलं जात आहे. तरीही लोक याचं गांभीर्य लक्षात न घेता घराबाहेर पडत असल्यानं पोलिसांनी अनेक ठिकाणी लाठीचा वापर केला. मात्र यामध्ये अशा पद्धतीनं लोकांना आवाहन करणाऱ्या या पोलीसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे वाचा : कोरोनामुळे वाढदिवस ठरला स्पेशल, 8 वर्षीय चिमुकलीचा 18 सेकंदाचा VIDEO VIRAL
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या