मुंबईच्या चाळीत पोहोचला Coronavirus; या 4 रुग्णांमुळे परिस्थिती जाऊ शकते हाताबाहेर

मुंबईतल्या आरोग्य सेवांपुढे सर्वांत मोठं संकट उभं राहिलं आहे, कारण अरुंद झोपडपट्ट्यांपर्यंत आणि छोट्या चाळींपर्यंत Coronavirus पोहोचला आहे.

मुंबईतल्या आरोग्य सेवांपुढे सर्वांत मोठं संकट उभं राहिलं आहे, कारण अरुंद झोपडपट्ट्यांपर्यंत आणि छोट्या चाळींपर्यंत Coronavirus पोहोचला आहे.

  • Share this:
    मुंबई, 26 मार्च : कोरोनाव्हायरसने राज्यभर हातपाय पसरले आहेत, पण मुंबईत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. आता इथल्या आरोग्य सेवांपुढे सर्वांत मोठं संकट उभं राहिलं आहे, कारण मुंबईच्या अरुंद झोपडपट्ट्यांपर्यंत आणि छोट्या चाळींपर्यंत Coronavirus पोहोचला आहे. गेल्या दोन- तीन दिवसात मुंबईत सापडलेले कोरोनाचे रुग्ण विदेशातून आलेले किंवा त्यांच्या थेट संपर्कात आलेले नातेवाईक नसून त्यांच्या दुय्यम संपर्कांतून आलेले आहेत. त्यातही 65 वर्षांची एक स्त्री तर कुणाच्याही परदेशातून आलेल्या व्यक्तीपासून संक्रमित झालेली नाही, असं दिसून आलं. परळच्या एका चाळीत राहणाऱ्या या स्त्रीचं प्रभादेवीला खाद्यपदार्थांचं दुकान आहे. ते काही दिवसांपर्यंत सुरू होतं. आसपासच्या भागातली कित्येक माणसांनी या खानावळीतून खाद्यपदार्थ नेलेले आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू? काय आहे फोटोमागची कथा दोन दिवसांपूर्वी घाटकोपरच्या झोपडपट्टीत एका 25 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. याच झोपडपट्टीत राहणाऱ्या 68 वर्षांच्या स्त्रीला त्याअगोदर लागण झाली होती. ती एका कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीकडे घरकाम करणारी आहे. आणखी एक पॉझिटिव्ह केस सापडली कलिनाच्या झोपडपट्टी भागात. एका 37 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. जेमतेम 8 बाय 10 फुटांच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्या वस्तीत कोरोनाव्हायरस पोहोचल्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचं काम किती बिकट झालं आहे, याची बातमी मुंबई मिररने दिली आहे. मुंबईच्या चाळींमध्ये एक किंवा दोन खोल्यांमध्ये संसार मांडून सात-आठ जणसुद्धा राहतात. बहुधा अशा चाळींतून कॉमन स्वच्छतागृह आणि संडास असतात. त्यामुळे स्वच्छतागृह वापरण्यासाठी, भाजी आणण्यासाठी लोक घर सोडून खाली येतातच. एवढाशा खोलीत होम क्वारंटाइन किंवा विलगीकरण आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं अशक्य आहे. या चारही रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आलं आहे आणि त्यांच्या संपर्कातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा महापालिकेचे आरोग्यसेवक प्रयत्न करत आहेत. पण या पॉझिटिव्ह केसेस सापडण्यापूर्वी त्यांचा कित्येक लोकांशी संपर्क झालेला असू शकतो. लॉक डाऊनमध्ये बीचवर गेलेल्या तरुणांना पोलिसांनी हेलिकॉप्टर आणून पकडलं आता अशा वस्त्यांमध्ये कोरोनाव्हायरस पोहोचल्यामुळे त्याचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता आहे. महापालिकेचे कर्मचारी या वस्त्यांमध्ये फवारणी करत निर्जंतुकीकरण करत आहेत. पण संपर्कातून हा व्हायरस पसरलेला असण्याचा धोका नाकारता येत नाही. कोरोनाव्हायरसची लक्षण न दिसणारे अनेक जण कंडक्टर असू शकतात, त्यामुळे आता हा धोका आणखी पुढचे काही दिवस तरी कायम राहणार.
    First published: