मुंबई, 26 मार्च: कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली वावरणाऱ्या नागरिकांना एक दिलासा देणारी बातमी आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. गुरुवारी वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली. लॉक डाऊन मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे , त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हेही वाचा… कोरोना: डी वाय पाटील हॉस्पिटलला नोटीस, महिलेच्या मृत्यूबाबत हलगर्जीपणाचा आरोप मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात असेही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरले. राज्यपालांनीही केली मोठी घोषणा दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन देण्याचे आज जाहीर केले. आपला धनादेश लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजभवनातील सर्व अधिकारी व कर्मचारी देखील आपले एक दिवसाचे वेतन करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे राजभवनाकडून आज जाहीर करण्यात आले. **हेही वाचा..** ‘आता फक्त ‘हे’ 3 पर्याय आहेत’, अमोल कोल्हेंनी करून दिली गंभीर धोक्याची जाणीव राज्यपालांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 21 दिवसांच्या संचारबंदीच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १४ एप्रिल पर्यंत आपले सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. या कालावधीत जनतेच्या भेटी देखील रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र राज्यपाल आपल्या कर्तव्य पालनाकरीता आवश्यक अभ्यागत तसेच अधिकाऱ्यांना या कालावधीत भेटतील, असे आज राजभवनातून आज जाहीर करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.