मुंबई, 26 मार्च :चीनमध्ये Coronavirus चा धोका वाढू लागला तो हुबेई (Hubei) प्रांतातल्या वुहान (Wuhan) या शहरातून. वुहानमधून हा विषाणू जगभरात पसरला आणि त्यानं रौद्र रूप धारण केलं. आता कोरोनाव्हायरसचं केंद्र (Epicentre) चीनमधून इटलीत हललं आहे. स्पेनमधली दोन शहरही केंद्र होण्याच्या वाटेवर आहेत. आशिया खंडात आता चीननंतर भारताकडे धोका म्हणून पाहिलं जात आहे. त्यातही महाराष्ट्र आणि मुंबई या महासाथीचं भारतातलं केंद्र बनतं की काय अशी भीती आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. ती संख्या ही बातमी प्रसिद्ध होईपर्यंत 125 होती. गुरुवारी दिवसभरात कोरोनाव्हायरग्रस्तांची संख्या फक्त मुंबईत 15 ने वाढली. मुंबई महानगरात दिवसभरात दोन कोरोनाग्रस्त महिलांचे मृत्यूही झाले. आता मुंबईत उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बस 77 वर पोहोचली आहे. या साथीचा पॅटर्न पाहता मुंबईत धोका वाढला आहे.
मुंबईच्या चाळीत आणि झोपडपट्टीसदृश घनदाट लोकवस्त्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. तरीही मुंबईकर अद्याप सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाउन पुरेसं गांभीर्याने घेत नाहीत, असं चित्र आहे.
संबंधित मुंबईच्या चाळीत पोहोचला Corona; 4 रुग्णांमुळे परिस्थिती जाऊ शकते हाताबाहेर
मुंबईमध्ये प्रभादेवी भागामध्ये एका खानावळ चालवणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या एका कॉर्पोरेट ऑफिसजवळ ही महिला भोजन विक्रीचा व्यवसाय करते. ती परळच्या एका चाळीत राहात असल्याचं वृत्त मुंबई मिररने दिलं आहे. याशिवाय मुंबईत इतर 3 रुग्ण अशा दाट लोकवस्ती आणि खेटून घरं असलेल्या परिसरात राहणारे आहेत. त्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरण्याचा धोका आहे.
वाचा - मुंबईत प्रभादेवी भागात महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांना शोधून त्यांची केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. चाचण्या करण्यासाठी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं असून त्यांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. मुंबई महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली आहे.
त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की, पुण्यात गेल्या 60 तासांत एकाही नव्या रुग्णाची भर पडलेली नाही, अशी माहिती पुण्याच्या महापौरांनी दिली आहे. दुसरीकडे आज पुन्हा तीन अंकांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
अन्य बातम्या
सावधान! फक्त 20 मिनिटांत पसरतोय कोरोना, घरातच थांबा नाहीतर...
ठाण्यात कोरोना रुग्णाचा धक्कादायक प्रकार, रिपोर्ट पॉझिटिव्ह असतानाही ठेवलं लपून
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus