मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Explainer: 10 सेकंदांच्या व्हिडीओ क्लिपची विक्री तब्बल 6.6 दशलक्ष डॉलर्सना; इतकं काय आहे त्यात पाहा

Explainer: 10 सेकंदांच्या व्हिडीओ क्लिपची विक्री तब्बल 6.6 दशलक्ष डॉलर्सना; इतकं काय आहे त्यात पाहा

ऑक्टोबर 2020 मध्ये मियामी येथील कला संकलक (Art Collector) पाब्लो रॉड्रिग्ज-फ्राईल यांनी 10 सेकंदाच्या व्हिडीओ आर्ट वर्कवर (Video Art Work) तब्बल 67,000 डॉलर्स खर्च केले. हा व्हिडीओ निशुल्क ऑनलाईनवर पाहता आला असता. परंतु गेल्या आठवड्यात त्यांनी या व्हिडीओची विक्री 6.6 दशलक्ष डॉलर्सला केली.

ऑक्टोबर 2020 मध्ये मियामी येथील कला संकलक (Art Collector) पाब्लो रॉड्रिग्ज-फ्राईल यांनी 10 सेकंदाच्या व्हिडीओ आर्ट वर्कवर (Video Art Work) तब्बल 67,000 डॉलर्स खर्च केले. हा व्हिडीओ निशुल्क ऑनलाईनवर पाहता आला असता. परंतु गेल्या आठवड्यात त्यांनी या व्हिडीओची विक्री 6.6 दशलक्ष डॉलर्सला केली.

ऑक्टोबर 2020 मध्ये मियामी येथील कला संकलक (Art Collector) पाब्लो रॉड्रिग्ज-फ्राईल यांनी 10 सेकंदाच्या व्हिडीओ आर्ट वर्कवर (Video Art Work) तब्बल 67,000 डॉलर्स खर्च केले. हा व्हिडीओ निशुल्क ऑनलाईनवर पाहता आला असता. परंतु गेल्या आठवड्यात त्यांनी या व्हिडीओची विक्री 6.6 दशलक्ष डॉलर्सला केली.

पुढे वाचा ...

    अमेरिका, 04 मार्च : इंटरनेटचं जाळं विस्तारल्यामुळे अनेक गोष्टी आपल्याला अगदी सहज उपलब्ध होतात. इंटरनेटवरील विविध प्रकारचे व्हिडीओ हे आपल्या मनोरंजनाचं, ज्ञान, माहिती मिळवण्याचं माध्यम ठरत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडीओला युझर्सची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते. यातून एक प्रकारे अर्थकारणाचं चक्र देखील फिरतं. नुकतीच एक दहा सेकंदाची व्हिडीओ क्लिप (Video Clip) तब्बल 6.6 दशलक्ष डॉलर्सला विक्री झाली आहे. एखाद्या व्हिडीओ क्लिपला मिळणारी ही एकप्रकारे सर्वाधिक रक्कम म्हणता येईल.

    ऑक्टोबर 2020 मध्ये मियामी येथील कला संकलक (Art Collector) पाब्लो रॉड्रिग्ज-फ्राईल यांनी 10 सेकंदाच्या व्हिडीओ आर्ट वर्कवर (Video Art Work) तब्बल 67,000 डॉलर्स खर्च केले. हा व्हिडीओ निशुल्क ऑनलाईनवर पाहता आला असता. परंतु गेल्या आठवड्यात त्यांनी या व्हिडीओची विक्री 6.6 दशलक्ष डॉलर्सला केली.

    हा व्हिडीओ डिजीटल आर्टिस्ट (Digital Artist) बिपल यांनी तयार केला होता. बिपल यांचं खरं नाव माईक विकेंलमन. हा व्हिडीओ ब्लॉकचेनने प्रमाणित केलाय. व्हिडीओ कोणाच्या मालकीचे आहेत, त्याची निर्मिती कोणी केली आहे हे डिजीटल स्वाक्षरीनिशी प्रमाणित करण्याचं काम ब्लॉकचेन करते.

    सध्या डिजीटल मालमत्तेचा नवा प्रकार अस्तित्वात आला असून तो नॉन-फंजिबल टोकन (NFT) म्हणून ओळखला जातो. महामारीच्या कालावधीत केवळ ऑनलाईन अस्तित्वात असलेल्या गोष्टी मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्या. अशा गोष्टींवर पैसा खर्च करण्यात उत्साही गुंतवणूकदारांमध्ये चढाओढ लागल्याचं दिसून आलं, यालाच एनएफटी असं ढोबळ मानानं म्हणता येईल. एखादी पारंपारिक ऑनलाईन वस्तु जी सातत्याने पुनरुत्पादित केली जाऊ शकते, अशा गोष्टींचं सार्वजनिक दृष्टीने प्रमाणीकरण करण्याचे काम ब्लॉकचेन (Blockchain) तंत्रज्ञान करतं.

    (वाचा - पर्यायी इंधन म्हणून हायड्रोजन कितपत योग्य? घ्या जाणून याचे फायदे-तोटे!)

    याबाबत पाब्लो रॉड्रीग्ज – फ्राईल म्हणतात, की तुम्ही म्युझियममध्ये जाऊन तिथे असलेल्या मोनालिसाच्या पेटिंग्जचा फोटो काढू शकता. पण या फोटोला काही किंमत नाही कारण ही बाब ऐतिहासिक ठरत नाही. युएसमधील कलाकारांच्या कार्याबद्दल माहिती असल्याने मी बिपल यांच्याकडील एक पीस विकत घेतला. यामागील व्यक्ती ही अत्यंत महत्वाची आहे, हीच यामागील वास्तविकता म्हणता येईल. नॉन-फंजिबल म्हणजे अशा वस्तु की ज्या अव्दितीय आहे. त्यांच्या सारख्या त्याच आहेत. जसे की डॉलर, सोनं आदी.

    डिजीटल आर्टवर्क आणि स्पोर्टस कार्डपासून ते आभासी जगातील क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) वॉलेटपर्यंत गोष्टी एनएफटीची उदाहरणं म्हणून सांगता येतील. रॉड्रीग्ज-फ्रेले यांनी नुकताच एक कॉम्प्युटर जनरेटेड व्हिडीओ विकला होता. त्यात डोनाल्ड ट्रम्प हे स्टेजवरुन कोसळताना दिसत होते.

    एनएफटीसाठी महत्वाची बाजारपेठ असलेल्या ओपनसीने (OpenSea) ब्लॉकचेनच्या आकडेवारीचा हवाला देत सांगितलं की त्यांचे फेब्रुवारीमध्ये मासिक विक्रीचे प्रमाण 86.3 दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढलं होतं. जे जानेवारीत 8 दशलक्ष डॉलर्स होतं. त्यांची एक वर्षापूर्वी मासिक विक्री 1.5 दशलक्ष डॉलर्स होती.

    (वाचा - मंगळावरच्या रोव्हरला स्वतःच्या घरातून नियंत्रित करतोय हा भारतीय शास्त्रज्ञ)

    याबाबत ओपनसीचे सहसंस्थापक अलेक्स अटल्लाह म्हणाले, की जर तुम्ही दिवसातील 10 तास कॉम्प्युटरवर किंवा 8 तास डिजीटल क्षेत्रात घालवले तर तुमच्याकडून अर्थपूर्ण डिजीटल कलेची निर्मिती होऊ शकते. कारण डिजीटल हे एक जग आहे. एनएफटीमध्ये मोठा पैसा खेळत असला, तरी बाजारातील किंमत ही एखाद्या बुडबुड्याप्रमाणे असू शकते, त्यामुळे याबाबत गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. अनेक नव्या गुंतवणूकीप्रमाणे प्रमोशन किंवा पब्लिसिटी कमी झाली, तर या क्षेत्रात मोठ्या नुकसानीची शक्यता असते. अशावेळी बाजारात फसवणूक करणाऱ्यांना अनेक संधी उपलब्ध होतात. यावेळी अनेक जण बनावट नावांनी देखील फसवणूक करण्याची शक्यता असते.

    लिलाव कंपनी ख्रिस्टीजने बिपल यांचे 5000 डिजिटल चित्रांचं कोलाज पहिल्यांदाच विक्रीसाठी ठेवलं आहे आणि ते पूर्ण एनएफटी आहे. यासाठी 3 दशलक्ष डॉलर्सची बोली लागली असून, 11 मार्चला त्याची विक्री बंद होणार आहे.

    आम्ही एका अनभिज्ञ विश्वात आहोत. बोली लावण्याच्या पहिल्या 10 मिनिटांत आमच्याकडे 21 इच्छूकांकडून 100 हून अधिक बोली लावण्यात आल्या. आम्ही 10 लाख डॉलर्सवर होतो, असे ख्रिस्टीजच्या युध्दोत्तर आणि समकालीन कला क्षेत्रातील तज्ज्ञ नोहा डेव्हिस यांनी सांगितलं. यापूर्वी 1 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक किमतीला एका वस्तुची ऑनलाईन विक्री झाल्याचं आम्ही कधी पाहिलं नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.

    क्रिप्टोकरन्सीचा मुख्य प्रवाहात वापर वाढण्यासाठी 1766 मध्ये स्थापन झालेल्या लिलाव कंपनीने वस्तु विकणं व खरेदीसाठी इथर या क्रिप्टोकरनसीसोबतच पारंपरिक रुपयेही स्वीकारले. मला वाटतं की हा निर्णय अपरिहार्य होता. जेव्हा आपण अशा अपरिहार्यतेला विरोध करतो, तेव्हा फारशी चांगली कामे होत नाहीत. त्यामुळे आपण याचा स्वीकार करणं हे सर्वात चांगलं आहे, असं डेव्हिस यांनी क्रिप्टो पेमेंट स्वीकारण्याबाबत सांगितलं.

    (वाचा - खराब संत्र्यांमुळे उजळली स्पेनमधील घरे; वीज निर्मितीचा अनोखा प्रयोग यशस्वी)

    लेबरॉन जेम्स स्लॅम डंकसाठी 208k डॉलर्स

    ऑनलाइन वर्ल्ड निर्मितीसाठी व्हर्च्युअल रिअलिटीचा तसंच क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेनच्या लोकप्रियतेचा फायदा एनएफटीला होऊ शकतो. तसंच लॉकडाऊन दरम्यान ऑनलाइन किरकोळ व्यापार देखील वाढत आहे. त्यामुळे ऑनलाइन खरेदीतही रस वाढतोय. एनएफटी खरेदीकडे कल वाढण्याचं अजून एक कारण म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रीय बास्केटबॉल असोसिएशनची टॉप शॉट वेबसाईट. या वेबासाइटवर बास्केटबॉल खेळातील व्हिडिओशी संबंधित एनएफटी विकत घ्यायची किंवा त्यांचा व्यापार करायची सुविधा उपलब्ध आहे.

    ही सेवा सुरु होताच अवघ्या पाच महिन्यात या प्लॅटफॉर्मला 1,00,000 खरेदीदार मिळाले, तर 250 दशलक्ष डॉलर्सची विक्री झाली. यातील विक्री पीयर टू पीयर मार्केटप्लेसमध्ये होत असून प्रत्येक विक्रीवर एनबीएला रॉयल्टी मिळत आहे. हा वाढीचा दर कायम असून, फेब्रुवारीतील शुक्रवारपर्यंत एकूण 198 दशलक्ष डॉलर्सची विक्री झाली असून जानेवारीत ही विक्री 44 दशलक्ष डॉलर्स होती. म्हणजेच विक्रीत पाचपटीने वाढ झाली आहे, असे टॉपशॉटने सांगितलं.

    प्रत्येक कलेक्टिबलमध्ये ब्लॉकचेनव्दारे संरक्षित मालकीची हमी असलेला एकमेव अनुक्रमांक असतो. जेव्हा तुम्ही #24/49 a Legendary LeBron Dunk खरेदी करता, तेव्हा तुम्ही त्याचे एकमेव मालक असता. आजपर्यंतचा सर्वांत मोठा व्यवहार या माध्यमातून 22 फेब्रुवारीला झाला. एका युझरने या दिवशी लेब्रोन जेम्स स्लॅम डंक यांच्या व्हिडीओसाठी 208,000 डॉलर्स मोजले.

    प्रॅान्क्सी असे टोपणनाव असलेल्या एनएफटीमधील एका उद्योजकाने रॉयटर्सला सांगितलं की, 2017 च्या सुरुवातीला मी एनएफटी प्रोजक्टमध्ये 600 डॉलर्सची गुंतवणूक केली होती. आता माझा क्रिप्टोकरन्सी आणि एनएफटीमध्ये सात आकडी पोर्टफोलिओ तयार झाला आहे. कौटुंबिक प्रायव्हसी कायम ठेवण्यासाठी या व्यक्तीने त्याचं नाव जाहिर करण्यास नकार दिला. मी आतापर्यंत टॉप शॉटवर 1 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक खर्च केला आहे. आणि त्यावरील खरेदी-विक्रीतून 4.7 दशलक्ष डॉलर्स कमवले आहेत. हा साईटच्या सर्वात मोठ्या खरेदीदारांपैकी एक असल्याची पुष्टी एनबीए टॉपशॉटने केली आहे.

    ट्विटरच्या माध्यमातून घेतलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, की मी टॉप शॉट सुरू होण्याआधी मी कधीही बास्केटबॉल पाहिलेलं नव्हतं. मी एनएफटीतील रकमेकडे गुंतवणुकीच्या रुपात पाहत आहे.

    (वाचा - OMG! फक्त 10 सेकंदचा VIDEO 48 कोटी रुपयांना; इतकं काय आहे त्यात तुम्हीच पाहा)

    कम्प्युटर जनरेटेड इन्व्हायरमेंटचा उदय

    नॅशविल येथील नेट हार्ट हे एनएफटी गुंतवणूकदार असून ज्यांनी प्रॉंक्सी प्रमाणेच 2017 पासून गुंतवणूकीला सुरुवात केली. ऑटोग्लिप्स आणि क्रिप्टोपंक सारख्या डिजीटल आर्ट एनएफटी विकसित होताना त्यांनी पाहिलं आहे. हार्ट यांनी सांगितलं की, त्यांनी एनबीए टॉपशॉट वर लेब्रोन जेम्स कॉस्मिक एनएफटी 40,000 डॉलर्सला जानेवारीत विकत घेतला होता. त्यानंतर फेब्रुवारीत त्यांनी तो 125,000 डॉलर्सला विकला. प्रथम मला भिती वाटली. पण ती प्रत्यक्षात नव्हती. योग्यवेळी खरेदी-विक्री केल्यानं मी भाग्यवान ठरलो कारण मी धोका पत्करला.

    जानेवारीत 6 दशलक्ष डॉलर्सची एनएफटीमध्ये गुंतवणूक करणारे अॅन्ड्रयु स्टिनवॉल्ड यांनी सांगितलं की, कदाचित एनएफटी हे भविष्यात निकामी ठरु शकतं. पण एनएफटीबद्दल आश्वासक असलेल्या इतरांप्रमाणेच त्यांना एवढा विश्वास आहे की काही एनएफटी आपली किंमत राखतील आणि भविष्यातील डिजिटल मालकी हक्कांचं प्रतिनिधित्व करतील. ते म्हणाले, ‘आपण सतत ऑनलाइन असतो आणि आपल्या आयुष्यातील बराच काळ डिजिटल यंत्रणांशी जोडलेले असतो. त्यातूनच संपत्तीचे मालकी हक्क डिजिटल स्वरूपात आणण्याची कल्पना कुणालातरी सुचली आणि मेटाव्हर्सीचा म्हणजे डिजिटल चलनांचा उदय झाला. मला असं वाटतं की एक दिवस याची किंमत ट्रिलियन डॉलर्सएवढी होईल.’

    First published:

    Tags: Creativity, International, Video, Video clip