Home /News /technology /

पर्यायी इंधन म्हणून हायड्रोजन कितपत योग्य? घ्या जाणून याचे फायदे-तोटे!

पर्यायी इंधन म्हणून हायड्रोजन कितपत योग्य? घ्या जाणून याचे फायदे-तोटे!

पृथ्वीवर पुरेशा प्रमाणात उपलब्ध हायड्रोजनचा ग्रीन एनर्जीच्या रूपात वापर करण्याची सरकारची योजना आहे. पुढचे काही महिने मिशनच्या ड्राफ्टसोबत अर्थसंकल्पातील प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल.

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्प 2021-22 मध्ये राष्ट्रीय हायड्रोजन एनर्जी मिशनची (National Hydrogen Energy Mission) घोषणा केली. पृथ्वीवर पुरेशा प्रमाणात उपलब्ध हायड्रोजनचा ग्रीन एनर्जीच्या रूपात वापर करण्याची सरकारची योजना आहे. पुढचे काही महिने मिशनच्या ड्राफ्टसोबत अर्थसंकल्पातील प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हायड्रोजनचा उर्जा स्त्रोत म्हणून वापर करण्यासाठी एक रोडमॅप, ज्यामध्ये ग्रीन हायड्रोजनवर विशिष्ट लक्ष केंद्रित केलं आहे. यामुळे अर्थव्यवस्थेसह भारताची नूतनीकरण क्षमता वाढत आहे.' स्टील आणि रसायनांचा समावेश असलेल्या प्रस्तावित अंतर्भागाच्या क्षेत्रांत हायड्रोजनमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता असणारा सर्वात मोठा उद्योग म्हणजे वाहतूक. जो सर्व ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनाच्या एक तृतीयांश योगदान देतो. ज्याचे पारंपारिक इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा विशिष्ट फायदे आहेत. हायड्रोजन ऊर्जा मिशनच्या माध्यमातून भारताची योजना ग्रीन एनर्जी स्रोताला प्रोत्साहन देणं आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबन कमी करणं आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी फ्यूल सेल टेक्नॉलॉजिला 'बुद्धिमत्तापूर्वक मूर्ख' (mind- bogglingly stupid) असं म्हटलं आहे. इंडियन एक्सप्रेसने हायड्रोजन पर्यायी इंधन म्हणून कितपत योग्य आहे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (वाचा - खुशखबर! 2021मध्ये पगारात होणार मोठी वाढ, वाचा कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा) 1. हायड्रोजन - एक पर्यायी इंधन - भारत 2050 पर्यंत डीकार्बोनाइज होणार. 2022 पर्यंत 175 GW अक्षय ऊर्जा क्षमतेच्या महत्वाकांक्षी ध्येयाला 2021-22 च्या अर्थसंकल्पामध्ये गती मिळाली. अर्थसंल्पामध्ये अक्षय उर्जा विकास आणि हायड्रोजन एनर्जी मिशनसाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. स्वच्छ इंधन स्त्रोत म्हणून हायड्रोजनच्या क्षमतेचा सुमारे 150 वर्षांचा इतिहास आहे. 2. हायड्रोजन का? - भारताची वीज कोळशावर अवलंबून आहे. प्रदूषण आणि तेलाच्या किंमतीतील वाढ लक्षात घेता हायड्रोजन जीवाश्म इंधनाची जागा घेईल. - हा जगातील सर्वात मुबलक घटक आहे. जळत्या पेट्रोलच्या तुलनेमध्ये दोन ते तीन पट अधिक कार्यक्षम आहे. - याचा वाहतुकीला (भारतातील हरितगृह-गॅस उत्सर्जनाच्या एक तृतीयांश योगदान) तसंच लोह आणि पोलाद आणि रसायन क्षेत्रात फायदा होईल. 3. हायड्रोजनचे प्रकार - ग्रे हायड्रोजन - भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन स्थापन करतं. हायड्रोकार्बन मधून काढला जातो (जीवाश्म इंधन, नैसर्गिक वायू). जोड उत्पादन: CO2 ब्ल्यू हायड्रोजन - जीवाश्म इंधनापासून तयार होतो. उत्सर्जन/उत्पादनाद्वारे कॅप्चर आणि संग्रहित केला जातो. हा ग्रे हायड्रोजनपेक्षा चांगला आहे.

(वाचा -   क्या बात है! 15 वर्षाच्या मुलानं बनवलं WhatsApp च्या तोडीचं भारतीय अ‍ॅप)

ग्रीन हायड्रोडन - अक्षय उर्जापासून (सौर आणि वारा) ग्रीन हायड्रोजन तयार होतो. वीज हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये (hydrogen and oxygen) पाण्याचं विभाजन करतं. 4. इव्हीचे प्रकार - HEVs (Hybrid electric vehicles) - हाइब्रिड इलेक्ट्रिक वाहन : उच्च इंधन अर्थव्यवस्था (पेट्रोल कारपेक्षा कमी इंधनाचा वापर), कमी टेलपाइप उत्सर्जन PHEVs (PLUG-IN HYBRID VEHICLES) - प्लग इन हायब्रिड वाहन : बॅटरी + पेट्रोल BEVs (Battery-powered Electric vehicles) - बॅटरी पॉवर्ड इलेक्ट्रिक वाहन : पूर्णपणे इलेक्ट्रिक, रिचार्जेबल, बॅटरी, पेट्रोल नाही. FCEVs (Fuel- cell electric vehicles) - फ्यूल सेल इलेक्ट्रिक वाहन : हायड्रोजन + ऑक्सिजन (पूर्णपणे इलेक्ट्रिक, पण रिफ्यूएल, BEVs प्रमाणे रिचार्ज करावा लागत नाही.)

(वाचा - FASTag शी संबंधित 'या' गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर तुमचं अकाउंट होईल रिकामं!)

5. चांगल्या गोष्टी - - शून्य कार्बन फूटप्रिंट (हायड्रोजन काढण्यासाठी वीज जीवाश्म इंधन तयार करते) - टेस्ला मॉडेल एस सारखी श्रेणी प्रदान करतं. 500 किलोमीटर प्रति चार्ज - टाक्यांमध्ये (सीएनजीप्रमाणे) साठवलं जातं. - हेव्ही लिथियम-आयन बॅटरीपेक्षा हलकं. ट्रक, व्यावसायिक वाहनांसाठी चांगलं. - 5 मिनिटांत इंधन भरते. पायाभूत सुविधांचा अभाव - जगभरात 500 पेक्षा कमी हायड्रोजन स्टेशन्स आहेत. फक्त 3 कंपन्या उत्पादन करतात - होंडा, टोयाटो (जपान) आणि ह्युंदाई (दक्षिण कोरिया). सुरक्षा - स्फोट होण्याची शक्यता आणि जास्त ज्वलनशील आहे. जास्त प्रेशरमध्ये (up to 700 bar) स्टोअर केलं जातं.
Published by:news18 desk
First published:

Tags: Car, Tech news, Technology, Tesla electric car

पुढील बातम्या