मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Work From Home: मंगळावरच्या रोव्हरला स्वतःच्या घरातून नियंत्रित करतोय हा भारतीय शास्त्रज्ञ...

Work From Home: मंगळावरच्या रोव्हरला स्वतःच्या घरातून नियंत्रित करतोय हा भारतीय शास्त्रज्ञ...

परग्रहावर पाठवलेल्या रोबोला पृथ्वीवरच्या घरी बसून नियंत्रित करायचं म्हणजे एखाद्या विज्ञानकथेतल्यासारखंच वाटतं ना! पण हे खरं आहे. NASAने मंगळावर (Mars mission) पाठवलेला पर्सिव्हरन्स रोव्हर (Perseverance Rover) काही दिवसांपूर्वी त्याच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवला आहे.

परग्रहावर पाठवलेल्या रोबोला पृथ्वीवरच्या घरी बसून नियंत्रित करायचं म्हणजे एखाद्या विज्ञानकथेतल्यासारखंच वाटतं ना! पण हे खरं आहे. NASAने मंगळावर (Mars mission) पाठवलेला पर्सिव्हरन्स रोव्हर (Perseverance Rover) काही दिवसांपूर्वी त्याच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवला आहे.

परग्रहावर पाठवलेल्या रोबोला पृथ्वीवरच्या घरी बसून नियंत्रित करायचं म्हणजे एखाद्या विज्ञानकथेतल्यासारखंच वाटतं ना! पण हे खरं आहे. NASAने मंगळावर (Mars mission) पाठवलेला पर्सिव्हरन्स रोव्हर (Perseverance Rover) काही दिवसांपूर्वी त्याच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवला आहे.

पुढे वाचा ...

लंडन, 2 मार्च: परग्रहावर पाठवलेल्या रोबोला पृथ्वीवरच्या घरी बसून नियंत्रित करायचं म्हणजे एखाद्या विज्ञानकथेतल्यासारखंच वाटतं ना! पण हे खरं आहे. NASAने मंगळावर (Mars mission) पाठवलेला पर्सिव्हरन्स रोव्हर (Perseverance Rover) काही दिवसांपूर्वी त्याच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवला आहे. त्याचं नियंत्रण एका भारतीयाच्या हाती आहे. तो लंडनमध्ये आपल्या घरात बसून हा मंगळावरचा रोबो चालवत आहे. कमाल आहे ना!

नासा (NASA) या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने मंगळ (Mars) ग्रहावर पाठवलेला पर्सिव्हरन्स रोव्हर (Perseverance Rover) काही दिवसांपूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवला आहे. हा रोव्हर (Rover) आता मंगळावर जीवसृष्टी आहे का, याचा शोध घेईल. त्याचं नियंत्रण अर्थातच पृथ्वीवर म्हणजे नासाच्या हाती आहे. यातली एक विशेष गोष्ट म्हणजे हा रोव्हर NASA चं मुख्यालय किंवा ऑफिसातून चालवला जात नाहीये, तर त्याचं नियंत्रण एका घरातून केलं जात आहे.  एक भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ आपल्या घरातून हा मंगळावरचा रोव्हर चालवत आहेत.  प्रा. संजीव गुप्ता (Prof. Sanjeev Gupta NASA) असं या शास्त्रज्ञाचं नाव आहे.

डॉ. संजीव गुप्ता त्यांच्या दक्षिण लंडनमधल्या (South London) घरात बसून या रोव्हरचं नियंत्रण करत आहेत. कोरोनामुळे प्रवासावर निर्बंध असल्यामुळे असं केलं जात असून, या कारणासाठी एक बेडरूमचा फ्लॅट भाडेतत्त्वावर घेण्यात आला आहे. भारतीय वंशाचे प्रा. गुप्ता 55 वर्षांचे असून, ते लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये भूविज्ञानाचे (Earth Science) विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सेंट क्रॉस कॉलेजमधून त्यांची पीएचडी केली आहे. नासाच्या मंगळ ग्रहासंबंधीच्या या मोहिमेअंतर्गत 2027मध्ये मंगळ ग्रहावरून मातीचे नमुने (Samples) आणले जाणार आहेत. त्यासाठी या मोहिमेत सहभागी झालेल्या शास्त्रज्ञांपैकी संजीव गुप्ताही एक आहेत. मंगळावरून आणलेल्या या नमुन्यांच्या तपासणीनंतरच मंगळावर जीवसृष्टी आहे की नाही, याचा शोध लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात प्रा. गुप्ता आणि त्यांचे सहकारी पर्सेव्हरन्स या रोव्हरने मंगळावर करण्याची कामं निश्चित करतील आणि करवून घेतील.

तरुणीच्या जिद्दीला सलाम; पाय गमावलेली सोनम ठरली सर्वोत्कृष्ट डान्सर

या मोहिमेदरम्यान कॅलिफोर्नियात (California) नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबमध्ये उपस्थित राहता येत नसल्याबद्दल प्रा. गुप्ता यांना खेद वाटतो. आपल्या कुटुंबाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या घराच्या जवळच दक्षिण लंडनमध्ये एका सलूनच्या वर एक बेडरूमचा फ्लॅट भाड्याने घेतला आहे. तिथेच बसून ते पर्सेव्हरन्स रोव्हरचं काम करत आहेत. कोरोनामुळे सध्या प्रवासावर निर्बंध आहेत. त्यामुळे या मोहिमेशी निगडित 400हून अधिक शास्त्रज्ञ सध्या वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

(हे पाहा: ऑटोमध्येच थाटला संसार; आनंद महिंद्रांनीही PHOTO शेअर करत केलं कौतुक)

प्रा. गुप्ता यांनी सांगितलं, की पर्सेव्हरन्स रोव्हर मंगळ ग्रहावरच्या जजीरो नावाच्या विवरात (Crater) उतरलं आहे. संशोधनाच्या दृष्टीने ते एक चांगलं ठिकाण आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अब्जावधी वर्षांपूर्वी एखाद्या छोट्या ग्रहाची मंगळाशी टक्कर होऊन हे विवर बनलं असावं. तिथे जुन्या नदीचे अवशेष, त्रिभुज प्रदेश दिसत आहेत. रोजच्या रोज ऑनलाइन बैठका घेऊन प्रा. गुप्ता यांची टीम कोणत्या ठिकाणाहून नमुने घ्यायचे हे निश्चित करते. त्यानुसार रोव्हरला आज्ञा दिल्या जातात.

कोरोना, लॉकडाउन यांमुळे वर्क फ्रॉम होम ही आता एक सर्वसाधारण गोष्ट झाली आहे; पण परग्रहावर पाठवलेल्या रोबोटला घरी बसून नियंत्रित करायचं म्हणजे एखाद्या विज्ञानकथेतल्यासारखंच वाटतं ना! पण ही कथा नव्हे, तर मानवाच्या प्रगतीची साक्ष आहे. त्यातही भारतीय शास्त्रज्ञाकडे या कामगिरीची जबाबदारी असल्याने भारतीयांसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.

First published:
top videos

    Tags: Mars, Nasa