मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /OMG! फक्त 10 सेकंदचा VIDEO 48 कोटी रुपयांना; इतकं काय आहे त्यात तुम्हीच पाहा

OMG! फक्त 10 सेकंदचा VIDEO 48 कोटी रुपयांना; इतकं काय आहे त्यात तुम्हीच पाहा

किंंमत वाचून तुम्हालाही चक्कर आली असेल. आता या व्हिडीओत (Video) आहे तरी काय असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल.

किंंमत वाचून तुम्हालाही चक्कर आली असेल. आता या व्हिडीओत (Video) आहे तरी काय असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल.

किंंमत वाचून तुम्हालाही चक्कर आली असेल. आता या व्हिडीओत (Video) आहे तरी काय असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल.

वॉशिंग्टन, 02 मार्च : ऑनलाइन व्हिडीओ (online video) पाहताना काही व्हिडीओ (video) तुम्हाला फ्री पाहता येतात तर काही व्हिडीओसाठी तुम्हाला किंमत मोजावी लागते. दरम्यान सध्या अशा एका व्हिडीओची चर्चा आहे, जो तुम्ही ऑनलाइन फ्री तर पाहू शकता पण तो खरेदी करायचा असल्यास तुम्हाला कोट्यवधी रुपये मोजावे लागतील. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल अवघ्या 10 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे, जो तब्बल 48 कोटी रुपयांना विकला गेला आहे (10 second video clip sold for 48 crore rupee). किंंमत वाचून तुम्हालाही चक्कर आली असेल आणि असं या व्हिडीओत आहे तरी काय असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल.

मिआमीच्या आर्ट कलेक्टरनं हा व्हिडीओ 67 हजार डॉलर म्हणजे 49 लाख रुपयांना खरेदी केलो हाता. आता  6.6 दशलक्ष डॉलर म्हणजे 48 कोटी रुपयांना विकला आहे. पाब्लो रोड्रिग्ज फ्रेली असं या आर्ट कलेक्टरचं नाव आहे. हा व्हिडीओ ऑनलाइन फ्री पाहता येतो. पण त्यांना या व्हिडीओसाठी फक्त एका वर्षात तब्बल 100 पट किंमत मिळाली आहे. आता या व्हिडीओत नेमकं आहे तरी काय ते तुम्हीच पाहा.

" isDesktop="true" id="526834" >

या व्हिडीओत एक विशाल डोनाल्ड ट्रम्प जमिनीवर पडलेले दाखवण्यात आले आहेत आणि त्यांच्या शरीरावर स्लोगन लिहिलेले आहेत. याचा अर्थ हा व्हिडीओ निवडणुकीआधी बनवण्यात आला होता. आता ट्रम्प हरल्यानंतर लोक रोज हा व्हिडीओ ऑनलाइन पाहत आहेत.

हे वाचा - या टपरीवर एक कप चहासाठी मोजावे लागतात तब्बल 1000 रुपये; पाहा काय आहे खास

व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यात तुम्हाला फारसं काही नवीन दिसणार नाही. पण मग याची इतकी किंमत का. तर पहिलं म्हणजे हा व्हिडीओ डिजीटल आर्टिस्ट बीपलनं तयार केला आहे, ज्याचं खरं नाव माइक विंकलमन आहे. बिपल हा अमेरिकेत राहणारा एक कलाकार आहे. क्षेत्रात त्याचं बरंच नाव आहे, त्यामुळे हा व्हिडीओ तितकाच किमतीदेखील आहे.

आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या व्हिडीओचं ऑथंटिकेशन ब्लॉकचेनामार्फत आहे.  म्हणजे जो या व्हिडीओचा मूळ मालक आहे, त्याच्या डिजिटल सिग्नेचरच्या माध्यमातूनच हा व्हिडीओ ओपन होतो. याला नॉन फंगेबल टोकन म्हणजे एनएफटी म्हटलं जातं. अशा पद्धतीचे एनएफटी व्हिडीओची अनेक साईटवर विक्री होते. महिनाभरात कोट्यवधींची विक्री होते.

हे वाचा - याला कोणतीच मुलगी नाही म्हणणार नाही, तरुणानं केलं असं हटके प्रपोज; VIDEO VIRAL

बीपल गेल्या 12 वर्षांपासून दररोज असा एक डिजीटल व्हिडीओ बनवतात. आतापर्यंत त्यांनी 4000 पेक्षा जास्त व्हिडीओ तयार केले आहेत आणि त्यांची विक्रीही होऊ लागली आहे.  तुम्ही युट्यूबर जाऊन किंवा ऑनलाइन त्यांचे हे व्हिडीओ मोफत पाहू शकता पण तुम्हाला जर या व्हिडीओचं ओरिजनल मालिक बनायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडीओ विकत घ्यावा लागेल. मग ब्लॉकचेनच्या माध्यमातून तुम्ही याचे खरे मालक व्हाल. जेव्हा तुम्ही डिजिटल सिग्नेचर कराल तेव्हाच हा व्हिडीओ ओपन होईल.

First published:

Tags: Video, Video clip, Viral videos