राज्याच्या राजकारणात सध्या महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेच्या संभाव्य युतीच्या चर्चा असताना, उरण नगरपरिषद निवडणुकीत एक मोठी आणि ऐतिहासिक राजकीय कलाटणी झाली आहे. उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (राष्ट्रवादी शरद पवार गट, ठाकरे गट शिवसेना, काँग्रेस) आणि मनसे यांनी एकत्र येत युती केली आहे. ...