संपूर्ण राज्यात दिवाळीचा झगमगाट असताना, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील पूरग्रस्त बळीराजासाठी यंदाची दिवाळी दुःखाची ठरली आहे. पुराच्या जखमा अजूनही ताज्या असून, शेतकरी कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. घरात धान्याचा तुटवडा, जनावरे आणि शेतीचे साहित्य पुरात वाहून गेले. त्यामुळे घरात ना आकाश कंदील, ...