Home /News /technology /

YouTube चं नवं अपडेट, युजर्सला Video पाहताना असा होणार फायदा

YouTube चं नवं अपडेट, युजर्सला Video पाहताना असा होणार फायदा

या नव्या फीचरअंतर्गत यूट्यूब आपल्या व्हिडीओचा सर्वाधिक रीप्ले होणारा भाग हायलाइट करेल.

  नवी दिल्ली, 21 मे : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media) आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी वेळोवेळी नवे अपडेट जारी करत असतं. याचदरम्यान व्हिडीओ प्लॅटफॉर्म यूट्यूबने (YouTube) आपल्या युजर्ससाठी शॉर्ट व्हिडीओमध्ये ग्रीन स्क्रिन फीचर सुरू करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे फीचर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या व्हिडीओ किंवा यूट्यूब शॉर्ट व्हिडीओच्या 60 सेकंदाचा महत्त्वाचा भाग - व्हिडीओ वापरण्याची, पाहण्याची सुविधा देईल. यूट्यूबवर मोठ्या संख्येत पॉप्युलर व्हिडीओ आहेत. परंतु सर्वच व्हिडीओ पूर्ण शेवटपर्यंत पाहण्यासारखे असताचच असं नाही. अनेकदा एखाद्या मोठ्या व्हिडीओचा एक लहानसा भागच पाहण्यासारखा असतो. या नव्या फीचरअंतर्गत यूट्यूब आपल्या व्हिडीओचा सर्वाधिक रीप्ले होणारा भाग हायलाइट करेल.

  हे वाचा - आता गाडी चालवणं अधिक सुरक्षित होणार; टायर्ससाठीही येणार स्टार रेटिंग, सरकार लागू करणार नवा नियम

  शॉर्ट व्हिडीओचा वापर - व्हिडीओ क्रिएटर यूट्यूबवरुन कोणत्याही व्हिडीओ किंवा शॉर्ट व्हिडीओला आपलं बॅकग्राउंड म्हणून वापरू शकतात. आतापर्यंत हे फीचर यूट्यूब प्रीमियम युजर्ससाठी होतं, परंतु आता हे सर्व युजर्ससाठी लाँच करण्यात आलं आहे. कॉपीराइट कंटेंट असणारा म्यूझिक व्हिडीओ रिमीक्स केला जाऊ शकत नसल्याचंही यूट्यूबकडून सांगण्यात आलं आहे.

  हे वाचा - आत्महत्येसाठी कारणीभूत ठरतोय Smartphone? रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

  या नव्या फीचरचा युजरला असा फायदा होईल, की युजर्सला एखाद्या व्हिडीओचा एखादा खास भाग पाहायचा असल्यास ते केवळ तो पॉप्युलर भागच पाहू शकतील. या फीचरमुळे युजरचा वेळ वाचेल. या फीचरच्या मदतीने युजर लगेचच व्हिडीओच्या त्या भागावर पोहोचतील, जो भाग त्यांना पाहायचा आहे, ज्याला सर्वाधिक लोकांनी रीप्ले करुन पाहिलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Tech news, Youtube, YouTube Channel, Youtubers

  पुढील बातम्या