• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • विना इंटरनेट आणि ब्ल्यूटूथशिवाय दुसऱ्या फोनशी कनेक्ट होईल तुमचा फोन, गुगलचं हे नवं अ‍ॅप असं करेल काम

विना इंटरनेट आणि ब्ल्यूटूथशिवाय दुसऱ्या फोनशी कनेक्ट होईल तुमचा फोन, गुगलचं हे नवं अ‍ॅप असं करेल काम

या अ‍ॅपच्या मदतीने दोन स्मार्टफोन युजर्स विना कोणत्याही कनेक्टिविटी शिवाय एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात. हे सर्व जवळपासच्या नेटवर्कच्या मदतीने कनेक्ट होतं, ज्याद्वारे युजर्स डेटा किंवा मेसेज शेअर करू शकतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 मार्च : गुगलने आपलं एक नवं अ‍ॅप लाँच केलं आहे. WifiNanScan असं या अ‍ॅपचं नाव आहे. या अ‍ॅपच्या मदतीने युजर्स आपल्या आसपासच्या स्मार्टफोन युजर्सशी कनेक्ट करू शकतात. WifiNanScan अ‍ॅप सध्या डेव्हलपर्ससाठी बनवण्यात आलं आहे, ज्याद्वारे ते वायफायसह एक्सपेरिमेंट करू शकतात. वायफाय Aware एक Neighbour Awareness Networking आहे, जे स्मार्टफोन युजर्सला एक-दुसऱ्याशी कनेक्ट करण्यासाठी मदत करतात. एमेकांशी कनेक्ट करण्यासाठी स्मार्टफोन अँड्रॉईड 8 किंवा त्यावरील वर्जनवर चालवणं गरजेचं आहे. या अ‍ॅपच्या मदतीने दोन स्मार्टफोन युजर्स विना कोणत्याही कनेक्टिविटी शिवाय एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात. हे सर्व जवळपासच्या नेटवर्कच्या मदतीने कनेक्ट होतं, ज्याद्वारे युजर्स डेटा किंवा मेसेज शेअर करू शकतात.

  (वाचा - हायवेवर आपात्कालीन परिस्थितीसह नेटवर्कचीही समस्या आहे? जाणून घ्या सोपा उपाय)

  काय आहेत App चे फायदे - - या अ‍ॅपद्वारे वापरण्यात आलेल्या नेटवर्कच्या मदतीने युजर्स सुरक्षितरित्या प्रिंटरवर डॉक्युमेंट पाठवू शकतात. हे सर्व विना कोणत्याही नेटवर्कमध्ये लॉग-इन केल्याशिवाय होईल. - विना इंटरनेट कनेक्शनशिवाय तुम्ही कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये रिझर्वेशन करू शकता. हे सर्व विना इंटरनेट कनेक्शन होऊ शकतं.

  (वाचा - जाणून घ्या किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड?असं करा डिलिंक)

  - एयरपोर्ट सिक्योरिटी, कस्टम, इमिग्रेशनमध्ये तुम्ही विना कोणत्याही आयडीशिवाय चेकइन करू शकता. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरमधून डाउनलोड करता येऊ शकतं. अ‍ॅप 1 मीटरपासून 15 मीटरपर्यंत काम करतं. डेव्हलपर्स, OEMs आणि रिसर्चर्स या टूलचा वापर करून रेंज आणि डिस्टेंसला कॅल्क्युलेट करू शकता.
  Published by:Karishma Bhurke
  First published: