नवी दिल्ली, 22 मार्च : देशात हायवेच्या वाढत्या संख्येसह, हायवेवर होणाऱ्या अपघातांचं प्रमाणही वाढतं आहे. सर्वसाधारणपणे हायवे अशा भागातून जातो, जेथे नेटवर्कची समस्या येते. अशावेळी हायवेवर एखाद्या आपतकालीन परिस्थितीत जर एखाद्या पोलीस, हॉस्पिटल किंवा एखाद्या अथॉरिटीशी संपर्क करायचा असल्यास, नेटवर्क नसल्याने मोठी समस्या येते. अशावेळी फोनमध्ये नेटवर्क नसल्यास, जाणून घ्या काय कराल...
नॅशनल हायवे अथॉरिटीच्या गाईडलाईन्सनुसार, हायवेवर प्रत्येक 1 किंवा 2 किलोमीटरवर SOS (save our soul) बॉक्स लावलेला असतो. हा बॉक्स सोलर पॉवरने चालतो. त्यामुळे हे डाउन होण्याचं किंवा पॉवर कट होण्याची कोणतीही समस्या नसते. आपतकालीन परिस्थितीत या SOS बॉक्सचा वापर करता येऊ शकतो.
- हायवेवरुन जाताना तुमच्या जवळपास एक बॉक्स पाहावा लागेल, जो लाल रंगाचा असेल.
- त्या बॉक्सजवळ कॉल बटन प्रेस करुन उत्तराची वाट पाहावी लागेल.
- त्यानंतर तुमचा संपर्क ऑपरेटरशी होईल. त्या ऑपरेटरला तुमची समस्या सांगू शकता.
या SOS बॉक्समध्ये इनबिल्ट GPS असतो. या GPS च्या लोकेशनची माहिती सहजपणे कॉल ऑपरेटरला मिळते. या बॉक्सच्या साहाय्याने हायवेवर कठिण काळात तुम्हाला लवकरात लवकर मदत मिळू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.