जाणून घ्या किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड? असं करा डिलिंक

जाणून घ्या किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड? असं करा डिलिंक

कदा एखाद्या वेबसाईटचा वापर केल्यानंतर त्याचा वापर करणं सोडून दिलं जातं किंवा काही दिवसांनी आपण त्या वेबसाईटचा वापर करणंच बंद करतो. परंतु तरीही आपलं Gmail Account त्या वेबसाईटशी लिंक असतं. अशाप्रकारे किती वेबसाईटशी जीमेल अकाउंट लिंक आहे आणि त्या साईटवरुन जीमेल डिलिंग करायचं असल्याचं काही टीप्स फॉलो कराव्या लागतील.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 मार्च : अनेक वेबसाईट्सवर लॉग-इन करताना दोन पर्याय असतात. एक तर संपूर्ण माहिती भरावी लागते किंवा नवा आयडी-पासवर्ड बनववा लागतो किंवा आपल्या जीमेल (Gmail) अकाउंटवरुन त्या वेबसाईटवर एन्ट्री करावी लागते. त्यासाठी आपलं जीमेल अकाउंट त्या वेबसाईटशी लिंक केलं जातं. परंतु एकदा एखाद्या वेबसाईटचा वापर केल्यानंतर त्याचा वापर करणं सोडून दिलं जातं किंवा काही दिवसांनी आपण त्या वेबसाईटचा वापर करणंच बंद करतो. परंतु तरीही आपलं Gmail Account त्या वेबसाईटशी लिंक असतं. अशाप्रकारे किती वेबसाईटशी जीमेल अकाउंट लिंक आहे आणि त्या साईटवरुन जीमेल डिलिंग करायचं असल्याचं काही टीप्स फॉलो कराव्या लागतील.

मोबाईलवरुन कसं कराल डिलिंक -

Gmail Account किती वेबसाईट्सशी लिंक आहे हे पाहण्यासाठी, मोबाईलच्या Gmail App वर नाही, तर गुगल क्रोमवर (Gmail Chrome) जीमेल सुरू करावं लागेल. येथे तो जीमेल आयडी-पासवर्ड टाकावा लागेल, जो किती वेबसाईटशी लिंक आहे हे पाहायचं आहे. गुगल क्रोमवर लॉग-इन केल्यानंतर एक पेज समोर येईल. येथे स्क्रोल करुन खाली यावं लागेल. येथे View Gmail in: Mobile/ Older version/Desktop दिसेल.

(वाचा - Logout करायचं विसरलात? असं जाणून घ्या किती सिस्टममध्ये आजही ओपन आहे तुमचं Gmail)

Last Account Acitivity -

येथे Desktop क्लिक करावं लागेल. यानंतर डेस्कटॉपवर जसे मेल दिसतात. तसेच सर्व मेल दिसतील. या पेजवरही स्क्रोल करुन सर्वात खाली यावं लागेल. येथे तुम्ही वापरलेल्या Gmail ची माहिती असेल. याच माहितीच्या बाजूला एक Details असा पर्याय दिसेल. तेथे Last Account Acitivity दिसेल, तेथे Details वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Security Checkup वर क्लिक करावं लागेल.

(वाचा - या ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्यास होणार 1 वर्ष जेल,भरावा लागेल 10000 रुपये दंड)

गरज नसलेले अकाउंट डिलीट करा -

येथे सर्वात खाली Your saved password दिसेल. येथे तुमचं जीमेल अकाउंट किती वेबसाईट्सवर आणि App शी लिंक आहे, हे दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर Go to Password Checkup वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा जीमेल आयडी-पासवर्ड येथे टाकावा लागेल. येथे त्या अनेक App आणि Websites बाबत माहिती मिळेल, जेथे तुमचं जीमेल अकाउंट लिंक आहे. येथूनच साईड पॅनलवर क्लिक करुन अकाउंट लॉग-आउट करू शकता.

Published by: Karishma Bhurke
First published: March 22, 2021, 2:10 PM IST

ताज्या बातम्या