Home /News /technology /

भारतात 2021 मध्ये सर्वाधिक Google Search केला गेला हा शब्द; तुम्हीही शोधला का?

भारतात 2021 मध्ये सर्वाधिक Google Search केला गेला हा शब्द; तुम्हीही शोधला का?

कोणत्याही लहानशा गोष्टची माहितीही गुगल सर्च करुन मिळवता येते. कंपनी दरवर्षी Year in Search द्वारे लोकांनी सर्वाधिक काय सर्च केलं याबाबत माहिती देते.

  नवी दिल्ली, 9 डिसेंबर : Google अतिशय पॉप्युलर सर्च इंजिन आहे. कोणत्याही लहानशा गोष्टची माहितीही Google Search करुन मिळवता येते. कंपनी दरवर्षी Year in Search द्वारे लोकांनी वर्षभरात सर्वाधिक काय सर्च केलं याबाबत माहिती देते. यावर्षीही सर्वाधिक सर्च केलेल्या शब्दांची माहिती गुगलने दिली आहे. रिपोर्टनुसार, कोरोना काळातही भारतीयांचं क्रिकेटसाठीचं प्रेम कमी झालेलं नाही. Year in Search मध्ये क्रिकेट या चार्टमध्ये टॉपवर आहे. Indian Premier League IPL या 2021 वर्षात सर्वाधिक सर्च केलं गेलं. त्यानंतर Cowin सर्वाधिक वेळा सर्च केलं गेलं. या लिस्टमध्ये Cowin सर्च दुसऱ्या क्रमांकावर होतं. तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा भारतीयांचं क्रिकेट प्रेम दिसलं. सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या सर्च टर्ममध्ये ICC T20 World Cup तिसऱ्या नंबरवर होतं. त्यानंतर भारतीयांनी फुलबॉलदेखील मोठ्या प्रमाणात सर्च केलं. Euro Cup ओवरऑल सर्च टर्ममध्ये चौथ्या क्रमांकावर होतं. पर्सनलिटी लिस्टमध्ये गोल्डन बॉय नीरज चोपडा सर्वाधिक सर्च केलं गेलं. त्यानंतर पर्सनलिटी लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर बॉलिवूड किंग खान शाखरुख खानचा मुलगा आर्यन खानला सर्वाधिक सर्च केलं गेलं.

  Twitter CEO Parag Agrawal यांचा CV व्हायरल, मोठी बाब उघडकीस

  Game लिस्टमध्ये सर्वाधिक सर्च केलेला Free Fire हा एकमेव गेम ठरला. त्याशिवाय Near Me सर्चमध्ये सर्वाधिक सर्च कोरोना रिलेडेट होते. अनेक लोकांनी वॅक्सिन, कोविड टेस्ट, कोविड हॉस्पिटल, ऑक्सिजन सिलेंडर आणि CT स्कॅन बाबत सर्च केलं. तसंच टिफिन सर्विसबाबतही सर्वाधिक सर्च केलं गेलं. 2021 मध्ये सर्वाधिक गुगलवर सर्च केल्या जाणाऱ्या How to ...मध्ये भारतीयांनी पॅन कार्ड आधारशी जोडण्याची पद्धत सर्च केली. 2021 Google Trends आकड्यांनुसार, 28 मार्च ते 3 एप्रिल 2021 दरम्यान भारतात पॅन आधारशी लिंक करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आली.

  2021 मध्ये या Emoji ची जबरदस्त क्रेझ; तुम्हीही याचा सर्वाधिक वापर करता का?

  2021 मध्ये मूव्ही सर्च रिजल्टमध्ये तमिळ ब्लॉकबस्टर Jai Bhim मूव्ही टॉप लिस्टमध्ये होता. त्यानंतर बॉलिवूड मूव्ही शेरशहा सर्वाधिक सर्च केला गेला.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Google, Tech news

  पुढील बातम्या