मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /2021 मध्ये या Emoji ची जबरदस्त क्रेझ; तुम्हीही याचा सर्वाधिक वापर करता का?

2021 मध्ये या Emoji ची जबरदस्त क्रेझ; तुम्हीही याचा सर्वाधिक वापर करता का?

WhatsApp वर अनेक इमोजी आहेत. त्यापैकी एका इमोजीला जगभरात सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

WhatsApp वर अनेक इमोजी आहेत. त्यापैकी एका इमोजीला जगभरात सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

WhatsApp वर अनेक इमोजी आहेत. त्यापैकी एका इमोजीला जगभरात सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

नवी दिल्ली, 5 डिसेंबर : आजच्या सोशल मीडियाच्या काळात Emoji नेही आपली वेगळी जागा तयार केली आहे. मित्रांसोबत होणाऱ्या चॅटिंगमध्ये सतत इमोजीचा वापर केला जातो. WhatsApp वर अनेक इमोजी आहेत. त्यापैकी एका इमोजीला जगभरात सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

टियर्स ऑफ जॉय, (आनंदाच्या अश्रूसह खळखळून हसणारा इमोजी) हा इमोजी 2021 मध्ये सर्वाधिक वापर होणारा इमोजी ठरला आहे. एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायजेशन - यूनिकोड कंसोर्टियम (Unicode Consortium) जे जगभरात भाषांचं डिजिटलायजेशन करतात, त्यांच्या आकडेवारीनुसार, टियर्स ऑफ जॉय (Tears of Joy) इमोजीचा इतर इमोजीच्या तुलनेत 5 टक्के अधिक वापर केला गेला आहे.

रिपोर्टनुसार, 2021 मध्ये इतर पॉप्युलर इमोजीमध्ये रोलिंग ऑन द फ्लोअर इमोजी, लाफिंग फेस इमोजी, थम्ब्स अप इमोजी, जोरजोरात रडणारा इमोजी, नमस्ते इमोजी, फेस ब्लोइंग किस इमोजी, फेस विथ हार्ट्स आणि स्मायलिंग इमोजी सामिल आहे.

सब-कॅटेगरीमध्ये क्राउन, रॉकेट शिप इमोजी, बॉडी पार्ट्समध्ये फ्लेक्स्ड बायसेप्स, फ्लावर बुके, फुलपाखरु या इमोजीचा सर्वाधिक वापर केला गेला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Emoji चा रंग पिवळाच का असतो? जाणून घ्या इतिहास आणि कारण

विशेषज्ञांनी इमोजीचा रंग पिवळाच असण्यामागे कारण सांगितलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमोजीचा रंग व्यक्तीच्या स्किन टोनशी अतिशय मिळता-जुळता आहे. त्यामुळे तो पिवळ्या रंगाचा असतो. असंही म्हटलं जातं, की पिवळ्या रंगावर हसण्याचा भाव अधिक प्रमाणात अभिव्यक्त होतो.

तर दुसरीकडे, लोक ज्यावेळी खळखळून हसतात, त्यावेळी त्यांचा चेहराही हसून-हसून पिवळा पडतो. हेदेखील यामागचं कारण असल्याचं सांगितलं जातं, त्यामुळेच इमोजीचा रंग पिवळा असतो. पिवळा रंग हसतं-खेळतं आणि आनंदाचं प्रतिक आहे. पिवळ्या रंगात इमोशन्स अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होतात.

First published:
top videos

    Tags: Tech news