Home /News /technology /

Google I/O 2021: सर्च, लोकेशन हिस्ट्रीसह Android मध्ये येणार नवी प्रायव्हसी, सिक्योरिटी फीचर्स; असा होणार फायदा

Google I/O 2021: सर्च, लोकेशन हिस्ट्रीसह Android मध्ये येणार नवी प्रायव्हसी, सिक्योरिटी फीचर्स; असा होणार फायदा

सुरक्षितता आणि गोपनीयता या बाबी गुगलने गांभिर्याने घेतल्याचं गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई (Sunder Pichai) यांनी सांगितलं.

नवी दिल्ली, 20 मे : गुगल आय/ओ 2021 (Google I/O 2021) सुरू झालं असून, त्याचं प्रस्तावित मुखपृष्ठ काल रात्री एका इव्हेंटपूर्वी प्रकाशित झालं. गुगलने आयोजित केलेल्या इव्हेंटमध्ये केवळ गुगलशी संबंधित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी सुरक्षितता आणि गोपनीयता या बाबी गुगलने गांभिर्याने घेतल्याचं गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई (Sunder Pichai) यांनी सांगितलं. अँड्रॉईड (Android) : पर्सनल डॅशबोर्ड, इंडिकेटर्स, प्रायव्हेट कॉम्प्युट कोअर अँड्रॉईड 12 शी संबंधित प्रायव्हसी डॅशबोर्ड (Privacy Dashboard) ही गुगलची सर्वात मुख्य गोपनीयता आहे. हा इंटरफेस डिझायनिंगचा एक प्रकार आहे. हे सर्व अँड्रॉईड अ‍ॅपच्या परवानग्या (तसंच गुगलच्या स्वतःच्या सिस्टीम अ‍ॅपसह) पुढे आणतं आणि त्यांना ग्राफिकल इंटरफेस तसंच मॅनेज परमिशन या टॅबवर एकत्र आणतं. हे सर्व पूर्व होतंच, परंतु, जे टेक्नो सॅव्ही (Techno Savvy) युजर नाहीत, त्यांच्यासाठी जास्त सुलभ आहे. अ‍ॅडव्हान्स युजर्ससाठी देखील हा फार मोठा बदल नाही. परंतु, नवीन युजर्ससाठी अ‍ॅपला अधिक अ‍ॅक्सेसबल बनवतं, हे यातील खऱ्या अर्थाने नाविन्य म्हणता येईल. अन्य नवीन एडिशनमध्ये परमिशन इंडिकेटर्स (Permission Indicators) आहेत, ते रिअल टाईममध्ये तुम्ही कोणते अ‍ॅप अक्सेस करता हे फीचर फोन वापरणाऱ्या युजर्सला फोनच्या वरच्या बाजूला दर्शवेल. हा एक महत्वाचा बदल म्हणावा लागेल. यात अजून एक महत्वाचे वैशिष्ट म्हणजे अँड्रॉईड PRIVATE COMPUTE CORE. यामुळे गुगल तुमच्या मशीनची क्षमता तपासू शकतो. यात प्रक्रिया केलेला सर्व डेटा फक्त युजर्सच्या फोनवर स्थानिकीकृत केला जाईल. तसंच संवेदनशील मजकूर किंवा मथळे चुकून गुगल सर्व्हरवरुन लिक होऊ नये यासाठी हे फीचर पूरक ठरेल.

(वाचा - कुणालाही समजू न देता Facebook वर Online राहायचं आहे? वापरा या सोप्या स्टेप्स)

सर्च : क्विक डिलीट सर्च हिस्ट्री (Quick Delete Search History) सर्चमध्ये, गुगल फोनवरुन कोणत्याविषयी सर्च केलं जात आहे, हे पाहू शकतो, त्यामुळे प्रेडिक्टीव्ह टेक्स्टच्या (Predictive Text) माध्यमातून सर्चिंग अधिक सुलभ होतं. गोपनीयतेचा विचार करता, सर्चसाठी आता एक शॉर्टकट टूल देण्यात आलं असून, हे टूल युजर्स गुगल अकाऊंट, गुगल अ‍ॅप किंवा अकाउंट सेटिंगमध्ये वापरू शकतात. तसंच या व्यतरिक्त एक वनटॅप बटन लॉन्च करण्यात आलं असून, याद्वारे युजर्स 15 मिनिटांपूर्वी गुगलवर सर्च केलेला डेटा कंपनीच्या डेटा सर्व्हरवरून डिलीट करू शकतात. तडेटा-ट्रॅक न होता, ब्राऊझिंग मोड यामुळे निवडता येतो. फोटोज: LOCKED FOLDER जर तुम्ही गुगल फोटोज मोठ्या प्रमाणावर वापरत असाल, तर आता या अ‍ॅपमध्ये पासवर्ड लॉक्ड फोल्डर्स (Locked Folders) उपलब्ध होणार आहे. या फोल्डरमध्ये युजर्स आपले फोटो स्टोअर करू शकतील. संवेदनशील फोटो अनावधानाने पब्लिक लायब्ररीजमध्ये पब्लिश होऊ नये, यासाठी हे फीचर असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मॅप्स : क्विक स्विच लोकेशन हिस्ट्री (QUICK-SWITCH LOCATION HISTORY) गुगल मॅप्सवर युजर्सला पास्ट हिस्ट्रीच्या मदतीने लोकशनचा शोध घेणं सोपं होणार आहे. याबाबत गुगलने सांगितलं, की गुगलने अत्यंत अचूक भौगोलिक स्थान सेवांमुळे युजर्सला थेट ट्रॅक केल्याचं वाटत नाही, अशी आम्हाला खात्री आहे. गुगलने सांगितलं, की या पर्यायामुळे थर्ड पार्टी अ‍ॅप्सला ( Third Party Apps) युजर्सचा तंतोतंत लोकेशन डेटा मिळण्यावर प्रतिबंध येतात. युजर कोठे आहे याचा मागोवा घेणाऱ्या थर्ड पार्टी अ‍ॅप्सची संख्या कमी करण्यासाठी आम्ही हवामान अ‍ॅप्ससारख्या बाबींवर देखील काम करत आहोत, असंही गुगलने सांगितलं.

(वाचा - कोण पाहतंय तुमचा WhatsApp Profile Photo? ही आहे सोपी ट्रिक)

पासवर्ड मॅनेजर : (EASY IMPORT, SYNC, BREACH PROMPT) गुगलने पासवर्ड मॅनेजर ( Password Manager) बाबतही अपडेटस जाहिर केले आहेत. त्यामुळे आपला पासवर्ड डेटा सहजपणे उघड होऊ नये यासाठी युजरला थर्ड पार्टी मॅनेजर कडून गुगलवर सहजपणे इम्पोर्ट करता येईल. तसंच युजरचा पासवर्ड इंटरनेटवर कुठे वापरला जात असेल तसा अलर्ट युजरला मिळेल. तसंच पासवर्ड कुठे वापरला जात आहे असं गुगलला आढळल्यास तातडीने युजर्सला अकाऊंट डिटेल्स रिसेट (Reset) करण्यासाठी सिंगल टॅप आणि सोप्या स्टेप्स सुचवेल. युजर ट्रॅकिंग : (DIFFERENTIAL PRIVACY, FLOC) हे जरी नविन नसलं, तरी याबाबत गुगलने स्पष्ट केलं, की फेडरेटेड लर्निंग (Federated Learning) या तंत्रज्ञानामुळे कुकीज पुर्नस्थापित करता येतील. यापूर्वी युजर्सच्या गोपनीयतेबाबत लक्ष केंद्रीत जात नसल्याने गुगलवर चौफेर टीका झाली होती. त्यामुळे याद्वारे गुगलने सर्व नियंत्रण आपल्या हातात घेतलं आहे. युजर्सचा डेटा गोपनीय ठेवण्याबाबत पुरेशी काळजी घेत असल्याचं गुगलने स्पष्ट केलं असून गुगल प्ले स्टोअर डेव्हलपर्सला (Google Play Store Developers) गोपनीयतेवर आधारित डेटा ऑफर केला जाईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामुळे व्यावसायिकांना त्यांचे अ‍ॅप्स कोठे लोकप्रिय आहेत, याची कल्पना येईल. अज्ञात युजर्स हे त्यांच्या जाहिरातींचं लक्ष असेल.

(वाचा - तु्म्हीही पॉर्न सर्च केलं का? Google ने आता उचललं मोठं पाऊल)

वंश, धर्म, वैद्यकीय इतिहास आदींबाबतच्या संवेदनशील डेटाचा मागोवा घेतला जाईल. परंतु, त्याचं व्यावसायिकरण केलं जाणार नाही, असं गुगलने म्हटलं आहे. हे सर्व करण्यात अयशस्वी झाल्याने युजर्सला संघटनांच्या संवेदनशीलते बाबत न्याय करण्याचा मार्ग मिळाला आहे. संभाव्य कायदेमंडळा संदर्भातील प्रश्नांना आणि युजर्सच्या डेटावर असलेल्या नियंत्रणाबाबत अधिक प्रमाणात कायदेशीर मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Google, Tech news

पुढील बातम्या