Home /News /technology /

WhatsApp Users साठी Bad News; आता Chat Backup साठी येऊ शकते ही समस्या

WhatsApp Users साठी Bad News; आता Chat Backup साठी येऊ शकते ही समस्या

Google आता WhatsApp Backup साठी अनलिमिटेड स्टोरेज देणं बंद करू शकतं. त्याऐवजी WhatsApp Users ला एका लिमिटेड प्लॅनवर स्विच करण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं.

  नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. जगभरात जवळपास दोन अब्जाहून अधिक लोक याचा वापर करतात. WhatsApp युजर्सला Google Drive वर Chat Backup घेण्याची आणि रिस्टोर करण्याची सुविधा देतं. Google Drive वर Chat Backup घेऊन फोटो, व्हिडीओ आणि मेसेज एका डिव्हाइसवरुन दुसऱ्या डिव्हाइसवर स्विच करणं अतिशय सोपं आहे. WhatsApp Backup तुमच्या Google Drive स्टोरेजमध्ये मोजलं जात नाही. परंतु आता हे लवकरच यात बदल होऊ शकतात. WaBetaInfo रिपोर्टनुसार, Google आता WhatsApp Backup साठी अनलिमिटेड स्टोरेज देणं बंद करू शकतं. त्याऐवजी WhatsApp Users ला एका लिमिटेड प्लॅनवर स्विच करण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं. यासाठी 2000 MB डेटा प्रति युजर मिळू शकतो. म्हणजेच याहून अधिक WhatsApp Data, Google वर सेव्ह होणार नाही. WaBetaInfo एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे, जो WhatsApp साठी येणारे फीचर्स आणि अपडेट्स ट्रॅक करतो.

  WhatsApp चं नवं अपडेट, आता अधिकच सिक्योर होणार तुमचं Chat

  बॅकअप साइज मॅनेज - WaBetaInfo ने WhatsApp एका नव्या सेक्शनवर काम करत असल्याचं सांगितलं. नवं सेक्शन युजर्सला बॅकअप साइज मॅनेज करण्याची परवानगी देईल. त्याशिवाय युजर्स नको असलेले फोटो, व्हिडीओ, चॅट त्या बॅकअपमध्ये जाण्यापासून थांबवू शकतात. या फीचरमुळे युजर्स ठरवू शकतील, की काय बॅकअपमध्ये जावं आणि काय नाही. म्हणजेच बॅकअप साइज युजर्स कंट्रोल करू शकतात. परंतु हे नवं फीचर अनेक युजर्सला नाराजही करू शकतं.

  WhatsApp वर चुकूनही करू नका हे काम, अन्यथा ब्लॉक होऊ शकतं तुमचा Account

  सध्या WhatsApp Chat Backup करण्यासाठी Google Drive एक सोपा मार्ग आहे, जिथे युजर्स बॅकअप साइज मॅनेज न करता हवे तितके फोटो-व्हिडीओ-चॅट अपलोड करू शकतात. यासाठी कोणतंही लिमिट नाही. परंतु आता यावर मर्यादा येईल. अद्याप WhatsApp किंवा Google ने अनलिमिटेड बॅकअपबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Google, Tech news, Whatsapp, WhatsApp user

  पुढील बातम्या