मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp चं नवं अपडेट, आता अधिकच सिक्योर होणार तुमचं Chat

WhatsApp चं नवं अपडेट, आता अधिकच सिक्योर होणार तुमचं Chat

WhatsApp आता Cloud backup साठी end-to-end encryption ची चाचणी करणार आहे. त्यामुळे WhatsApp चे असे Chat सुरक्षित राहतील, ज्यांचा Google Drive आणि iCloud मध्ये बॅकअप आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : WhatsApp आपल्या युजर्सची सुरक्षा अधिकच वाढवणार आहे. WhatsApp आता Cloud backup साठी end-to-end encryption ची चाचणी करणार आहे. त्यामुळे WhatsApp चे असे Chat सुरक्षित राहतील, ज्यांचा Google Drive आणि iCloud मध्ये बॅकअप आहे. नव्या रिपोर्टनुसार, WhatsApp ने iOS आणि Android Beta टेस्टर्ससाठी end-to-end encryption रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे.

आतापर्यंत WhatsApp वर चॅटला End-to-end-encryption लागू होतं. तर WhatsApp च्या बॅकअपला हे फीचर नव्हतं. परंतु आता WhatsApp Backup साठीही हे फीचर देण्यात येणार आहे. End-to-end-encryption म्हणजे तुमचे चॅट केवळ सेंडर आणि रिसिव्हरचं पाहू शकतो. त्याशिवाय इतर कोणीही हे पाहू शकत नाही.

रिपोर्टनुसार, End-to-end-encryption चा वापर करुन बॅकअपच्या सुरक्षेसाठी एक वैयक्तिक पासवर्ड किंवा 64-बीट एन्क्रिप्शन Key निवडता येते. जर पासवर्ड विसरलात, तर WhatsApp तुमच्या चॅट हिस्ट्रीला एन्क्रिप्टेड बॅकअपमधून रिस्टोर करण्यासाठी तुमची मदत करू शकत नाही. त्यामुळे पासवर्ड लक्षात ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे.

फोटो एडिटिंगपासून ते मेसेज रिअ‍ॅक्शनपर्यंत; आता WhatsApp देणार हे जबरदस्त फीचर्स

कसं सुरू करता येईल हे फीचर -

सर्वात आधी WhatsApp Setting मध्ये जावं लागेल, ज्यात चॅट सेक्शनमध्ये चॅट बॅकअप पर्याय निवडा आणि त्यानंतर End-to-end Encrypted Backup सेटिंग ऑन करा. WhatsApp Settings > Chats > Chat Backup > End-to-end Encrypted Backup.

WhatsApp ने सध्या केवळ काही निवडक युजर्ससाठीच हे फीचर रोलआउट केलं आहे. सर्वांसाठी हे फीचर रोलआउट झाल्यानंतर तुम्ही अपडेट मिळवू शकतात.

दरम्यान, WhatsApp आपल्या प्लॅटफॉर्मवर लवकरच एक नवं फीचर जोडणार आहे. हे नवं फीचर व्हॉईस मेसेजबाबतचं असणार आहे. या फीचरद्वारे युजर्स App बंद केल्यानंतरही आलेला मेसेज पूर्ण ऐकू शकतील. या फीचरच्या मदतीने युजर्स चॅट बंद करुनही व्हॉईस मेसेज ऐकू शकतात. त्याशिवाय व्हॉईस मेसेज युजर्स सहजपणे बंदही करू शकतात.

First published:

Tags: Tech news, Whatsapp chat, Whatsapp New Feature, WhatsApp user