मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /WhatsApp वर चुकूनही करू नका हे काम, अन्यथा ब्लॉक होऊ शकतं तुमचा Account

WhatsApp वर चुकूनही करू नका हे काम, अन्यथा ब्लॉक होऊ शकतं तुमचा Account

युजर्सनी WhatsApp विरोधात जाऊन काही केल्यास, तुमचं WhatsApp Account ब्लॉक होऊ शकतं. WhatsApp वर बॅनपासून वाचण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

युजर्सनी WhatsApp विरोधात जाऊन काही केल्यास, तुमचं WhatsApp Account ब्लॉक होऊ शकतं. WhatsApp वर बॅनपासून वाचण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

युजर्सनी WhatsApp विरोधात जाऊन काही केल्यास, तुमचं WhatsApp Account ब्लॉक होऊ शकतं. WhatsApp वर बॅनपासून वाचण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. स्पॅम आणि इतर गोष्टींपासून वाचण्यासाठी whatsapp अनेक अकाउंट ब्लॉक किंवा डिलीट करत असतं. युजर्सनी WhatsApp विरोधात जाऊन काही केल्यास, तुमचं WhatsApp Account ब्लॉक होऊ शकतं. काही दिवसांपूर्वी WhatsApp ने आपल्या बॅन अकाउंटबाबत खुलासा केला होता.

WhatsApp ने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात 20,70,000 भारतीय अकाउंट्स बॅन करण्यात आली. यापूर्वी WhatsApp ने 16 जून ते 31 जुलै दरम्यान 30,27,000 युजर्सला बॅन केलं होतं. त्यामुळे WhatsApp वर बॅनपासून वाचण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

WhatsApp ची कारवाई; 20 लाखहून अधिक भारतीय युजर्सवर बॅन, सांगितलं हे कारण

- थर्ड पार्टी WhatsApp app चा वापर करू नका. GB WhatsApp, WhatsApp Plus, WhatsApp Mod आणि WhatsApp चे इतर मॉडिफाइड वर्जन सहजपणे ऑनलाइन उपलब्ध असतात. या थर्ड पार्टी Apps मध्ये ऑनलाइन स्टेटस हाइड करणं, कोणालाही न समजता मेसेज सीन करणं असे अनेक फीचर्स दिले जातात. परंतु हे Apps वापरु नयेत. यामुळे तुमचं अकाउंट बॅन होऊ शकतं.

- WhatsApp वर कोणतेही प्रमोशनल मेसेज पाठवू नका. अनोळखी नंबरवरुन प्रमोशनल मेसेज आल्यास, युजर्स स्पॅम मार्क करुन सेंडरला ब्लॉक करू शकतात. जर तुम्ही WhatsApp वर प्रमोशनल मेसेजस प्रायवेट चॅट किंवा ब्रॉडकास्टद्वारे पाठवत असाल, तर तुमचं अकाउंट ब्लॉक होऊ शकतं.

WhatsApp चं नवं अपडेट, आता अधिकच सिक्योर होणार तुमचं Chat

WhatsApp Account ब्लॉक झाल्यास काय कराल?

WhatsApp Account सस्पेंड झाल्यास, काही दिवसांनंतर ते रिस्टोर केलं जाऊ शकतं. परंतु एकदा रिस्टोर झाल्यानंतर पुन्हा चूक केल्यास अकाउंट कायमसाठी बॅन केलं जाऊ शकतं. जर तुम्हाला वाटत असेल, की बॅन चुकीचं आहे, तर अकाउंट रिस्टोरसाठी तुम्ही WhatsApp Support ला लिहू शकता. अकाउंट रिव्ह्यू केल्यानंतर तुमचं अकाउंट पुन्हा अॅक्टिव्हेट होऊ शकतं.

First published:

Tags: Tech news, WhatsApp chats, Whatsapp News, WhatsApp user