नवी दिल्ली, 6 डिसेंबर : Facebook Messenger आणि WhatsApp वर एक नवा फ्रॉड समोर आला आहे. यात स्कॅमर्स युजरला व्हिडीओ कॉल करुन अश्लील गोष्टी करतात आणि स्क्रिन रेकॉर्ड करतात. त्यानंतर व्हिडीओ लीक करण्याची धमकी देत युजरकडे पैशांची मागणी करतात.
अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, दिल्ली युनिवर्सिटीच्या एका प्रोफेसरसह हा प्रकार घडला. न्यूज एजेन्सी IANS नुसार, दिल्ली युनिवर्सिटीच्या प्रोफेसरला Facebook Messenger वर एक अनोळखी व्हिडीओ कॉल आला. या व्हिडीओ कॉलवर एक न्यूड तरुणी होती. प्रोफेसरने अशाप्रकारचा कॉल पाहून लगेचच डिसकनेक्ट केला. परंतु कॉल डिसकनेक्ट करेपर्यंत सायबर क्रिमिनल्सने प्रोफेसरचा न्यूड फोटो पाहतानाचा एक व्हिडीओ तयार केला.
त्यानंतर या सायबर क्रिमिनल्सने प्रोफेसरला त्रास देण्यास सुरुवात केली. स्कॅमर्सने व्हिडीओ कॉलचे स्क्रिनशॉट्स Messenger वर पाठवण्यास सुरुवात केली. घाबरुन त्यांनी लगेच त्या युजरला ब्लॉक केलं. पण पुन्हा तासाभराने प्रोफेसरला ऑडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्याने 20000 रुपयांची मागणी डिजिटल पेमेंटद्वारे केली. त्याशिवाय हे पैसे केवळ पाच मिनिटांत पाठवण्याचंही सांगितलं. पैसे न दिल्यास स्क्रिनशॉट्स फेसबुकवर शेअर करण्याची धमकी दिली. घाबरुन प्रोफेसरने फेसबुक अकाउंट डिअॅक्टिवेट केलं. यानंतर पुढे कोणत्याही गोष्टी घडल्या नाहीत.
परंतु अशाप्रकारच्या कॉलद्वारे लोकांना घाबरवून, फसवून पैसे मागण्यासाठी स्कॅम केला जातो. सायबर एक्सपर्ट्सनुसार या मोबाइल फ्रॉड लोकांची एक टोळी आहे, WhatsApp, Facebook Messenger वर व्हिडीओ कॉल करुन लोकांकडे पैशांची मागणी केली जाते. ही टोळी हरियाणातून ऑपरेट होत असल्याची माहिती आहे. अशा प्रकारची घटना घडल्यास लगेच सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला सायबर एक्सपर्ट्सनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Facebook, Online fraud, Tech news, Whatsapp alert, Whatsapp News