जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / फसवणुकीच्या नव्या 'क्लिकजॅकिंग'पासून सावधान, काही कळायच्या आत रिकामं होईल बँक अकाउंट

फसवणुकीच्या नव्या 'क्लिकजॅकिंग'पासून सावधान, काही कळायच्या आत रिकामं होईल बँक अकाउंट

फसवणुकीच्या नव्या 'क्लिकजॅकिंग'पासून सावधान, काही कळायच्या आत रिकामं होईल बँक अकाउंट

लोकांचे पैसे चोरी करण्यासाठी या गुन्हेगारांनी क्लिकजॅकिंग पद्धतीचा वापर केला होता. वाचा नेमका काय आहे हा प्रकार, कशी होते फसवणूक?

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 5 डिसेंबर : दिल्लीत ऑनलाइन फ्रॉडचा एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. नोव्हेंबरमध्ये हा प्रकार समोर आला. महत्त्वाची बाब म्हणजे तीन जणांना दिल्लीतून अटक करण्यात आली असली, तर त्यांचा मुख्य सुत्रधार अफ्रिकी नागरिक आहे. अफ्रिकी नागरिकाच्या इशाऱ्यावर दिल्लीतील तिघे ऑनलाइन फ्रॉड करत होते. चौकशीदरम्यान पोलिसांनी मिळालेल्या माहितीत, हे तीन गुन्हेगार आधी एखाद्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात अडकवत होते त्यानंतर त्यांच्या बँक खात्याचे डिटेल्स अफ्रिकी नागरिक काढत होता. याच चोरी केलेल्या माहितीच्या आधारे खात्यातून पैसे काढले जात होते. अफ्रिकी नागरिक लोकांच्या मोबाइलवर फिशिंग मेल पाठवत होता आणि त्यांच्याकडून बँक अकाउंट नंबर, आयडी, पासवर्ड अशी माहिती चोरी करत होता. या गुन्हेगारांचं लक्ष अधिकाधिक करंट आणि बिजनेस अकाउंटवर होतं, ज्यात लाखो-करोडोचे व्यवहार होत होते. लोकांचे पैसे चोरी करण्यासाठी या गुन्हेगारांनी क्लिकजॅकिंग पद्धतीचा वापर केला होता. यात हॅकर्स, स्कॅमर्स युजरला आधी एखाद्या योग्य लिंकवर क्लिक करण्यासाठी सांगतात आणि त्या योग्य लिंकच्या मागे फ्रॉड लिंक ठेवून त्यावर पुन्हा क्लिक करायला लावतात.

WhatsApp द्वारे खाली होऊ शकतं बँक अकाउंट, या गोष्टी लक्षात ठेवाच

कसा होतो फ्रॉड? मोबाइलवर तुमचा अल्टरनेट मोबाइल नंबर बदलण्यासाठी मेसेज पाठवला जातो. एखाद्याला खरंच नवं सिम कार्ड घ्यायचं असेल किंवा मोबाइल नंबर बदलायचा असेल, तर त्याला हा मेसेज खरा वाटतो. त्यामुळे एखादा व्यक्ती अल्टरनेट नंबर बदलण्यासाठी लिंकवर क्लिक करतो. परंतु सिम कार्ड बदलण्यासाठीची ही रिक्वेस्ट चुकीच्या नंबरवर जाते. या चुकीच्या नंबरवर सिम कार्ड बदलण्यसााठी कार्ड ब्लॉक केलं जातं, त्याचदरम्यान सायबर फ्रॉड करणारे त्या नंबरचं सिम काढतात आणि व्यक्तीचं नवं सिम कार्ड सुरू होण्याआधीच त्याच्या खात्यातून पैसे काढलेले असतात. दिल्लीतील या गुन्हेगारांनी अशाच प्रकारचा फ्रॉड केला. पीडित व्यक्तीला मोबाइल कॉल सेंटरद्वारे समजलं, की त्यांच्या नंबरचं सिम कार्ड अनोळखी व्यक्तीने लक्ष्मी नगर येथील एका स्टोरमधून काढलं होतं. पोलिसांची याची संपूर्ण चौकशी केली आणि कॉल सर्विस प्रोव्हाइडर्स आणि बँक सूचनेच्या आधारे या गुन्हेगारांची माहिती मिळवली. या गुन्हेगारांनी बनावट वोटर आयडीच्या माध्यमातून सिम कार्ड मिळवलं होतं. याच सिमच्या माध्यमातून ऑनलाइन बँकिंगचा वापर केला गेला आणि पीडित व्यक्तीच्या खात्यातून 10 लाख रुपये काढले गेले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात