मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्यांना झटका; Facebook ने आणलं हे नवं फीचर

अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्यांना झटका; Facebook ने आणलं हे नवं फीचर

याआधी युरोपीय डेटा अमेरिकी सर्वर्सवर ट्रान्सफर करण्यासाठी कंपन्या Privacy Shield कायद्याचा वापर करत होत्या. परंतु जुलै 2020 मध्ये युरोपीय कोर्टने याला रद्द केलं होतं.

याआधी युरोपीय डेटा अमेरिकी सर्वर्सवर ट्रान्सफर करण्यासाठी कंपन्या Privacy Shield कायद्याचा वापर करत होत्या. परंतु जुलै 2020 मध्ये युरोपीय कोर्टने याला रद्द केलं होतं.

Facebook वर आता महिलांच्या सहमतीशिवाय त्यांचे अश्लील Non-consensual intimate images (NCII)) व्हायरल होऊ शकत नाहीत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 5 डिसेंबर : Facebook वर आता महिलांच्या सहमतीशिवाय त्यांचे अश्लील Non-consensual intimate images (NCII)) व्हायरल होऊ शकत नाहीत. मेटाने वूमन सेफ्टीसाठी (Women Safety) फेसबुकला StopNCII.org सह जोडलं आहे. त्याशिवाय मेटाने वूमन सेफ्टी हबदेखील (Women Safety Hub) जारी केलं आहे. वूमन सेफ्टी हब 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होईल, ज्यात हिंदीदेखील सामिल आहे. या वूमन सेफ्टी हबमध्ये महिला फेसबुकवर सुरक्षित राहण्याच्या विविध टिप्सबाबत माहिती मिळवू शकतात, यासाठी त्यांना मेटाकडून काही विशेष टूलदेखील उपलब्ध करुन दिले जातील.

मेटा प्लॅटफॉर्म्सचे निर्देशक करुणा नॅन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सांगितलं, की META च्या या उपक्रमामुळे सर्व महिलांना या व्यासपीठाचा वापर करता येईल. भाषेशी संबंधित कोणाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

Facebook अनिवार्य करणार Two-Factor Authentication, कसं कराल अ‍ॅक्टिवेट

StopNCII.org टूल कसं काम करतं?

StopNCII.org एक असा प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा उद्देश प्लॅटफॉर्मवर परवानगीशिवाय कोणाचेही फोटो शेअर किंवा व्हायरल होण्यापासून वाचवणं. या प्लॅटफॉर्मवर पीडितांना अनेक टूल मिळतात, ज्याद्वारे ते आपल्या समस्यांच्या तक्रारी करू शकतात.

ज्यावेळी एखादा युजर तक्रार करेल, त्यावेळी या प्लॅटफॉर्मवर एका यूनिक आयडीच्या माध्यमातून विवादित पोस्टवर अॅक्शन घेतली जाईल. फेसबुकचं ऑटोमेटिक टूल अपलोड केलेल्या फोटोचं स्कॅनिंग करतं. तक्रार केल्यानंतर हे टूल त्या फोटोच्या आधारे एक खास डिजिटल आयडेंटिफायर जनरेट करतो. याच डिजिटल डेटाच्या आधारे हे टूल आपल्या पार्टनर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही स्कॅनिंग करतं. ज्यावेळी हे टूल इतर प्लॅटफॉर्मवर सारखाच फोटो पाहतो, त्यावेळी ऑटोमेटिक तो रिमूव्ह करतो, जेणेकरुन तो कोणीही पाहू नये.

StopNCII.org ने महिलांद्वारा आतापर्यंत रिपोर्ट केलेल्या प्रकरणात या टूलचा रिमूवल रेट 90 टक्के आहे.

META नुसार, भारतात यावेळी 33 टक्के महिला सोशल मीडियाचा वापर करतात. तर 67 टक्के भारतीय पुरुष फेसबुकचा वापर करतात.

First published:

Tags: Facebook, Tech news