Home /News /technology /

मृत्यूनंतर PAN आणि Aadhaar Card चं काय होतं.? वाचा काय आहे नियम

मृत्यूनंतर PAN आणि Aadhaar Card चं काय होतं.? वाचा काय आहे नियम

व्यक्ती जिवंत असताना अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या Aadhaar आणि PAN Card या डॉक्युमेंटचं व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय होतं? वाचा काय आहे नियम

  नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. बँक अकाउंट ओपन करण्यापासून ते कोणत्याही व्यवसासाठी, शाळेतील मुलांसाठीही या डॉक्युमेंटची गरज असते. व्यक्ती जिवंत असताना अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या डॉक्युमेंटचं व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय होतं? मृत्यूनंतर PAN Card ची कुठे असते गरज? बँक अकाउंटपासून ते डिमॅट अकाउंट आणि इन्कम टॅक्स रिटर्न्स करण्यासाठी पॅन कार्ड अतिशय आवश्यक ठरतं. त्यासाठी ते सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. जोपर्यंत सर्व अकाउंट बंद होत नाहीत, तोपर्यंत पॅन कार्ड सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. ITR फाइल करताना हे तोपर्यंत ठेवणं गरजेचं आहे, जोपर्यंत आयटी डिपार्टमेंटची प्रोसेस पूर्ण होत नाही. पॅन कार्ड सरेंडरआधी या गोष्टी लक्षात ठेवा - Income Tax डिपार्टमेंटकडे हा अधिकार असतो, की ते चार वर्षांच्या असेसमेंटला पुन्हा ओपन करू शकतात. त्यामुळे मृत व्यक्तीचं कोणतंही टॅक्स रिफंड बाकी असेल, तर ते त्याच्या खात्यात जमा व्हावं. ज्यावेळी खातं बंद करण्याची आणि इन्कम टॅक्स रिटर्नसंबंधी सर्व कामं पूर्ण होतील त्यावेळी मृत व्यक्तीचं पॅन कार्ड इन्कम डिपार्टमेंटकडे सोपवता येतं. पॅन कार्ड सरेंडर करण्याआधी मृत व्यक्तीची सर्व बँक खाती दुसऱ्या व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर किंवा बंद करावीत.

  हे वाचा - तुमच्या घरावर लक्ष ठेवतील CCTV Mobile Apps,चोरी होण्याच्या भितीपासून होईल सुटका

  पॅन कार्ड असं करा सरेंडर - पॅन कार्ड सरेंडर करण्यासाठी मृत व्यक्तीच्या प्रतिनिधीला अशा असेसमेंट अधिकाऱ्याला अर्ज लिहावा लागेल, ज्याच्या अधिकार क्षेत्रात हे पॅन कार्ड रजिस्टर्ड आहे. या अर्जात पॅन कार्ड सरेंडरसाठीचं कारण आणि सोबत मृत व्यक्तीचं नाव, पॅन नंबर, जन्मतारीख, डेथ ऑफ सर्टिफिकेट सारखी कागदपत्र द्यावी लागतील. जर भविष्यात या पॅन कार्डची आवश्यकता भासेल असं वाटत असेल, तर ते तुम्ही ठेवूही शकता. मृत्यूनंतर Aadhaar Card चं काय होतं? आधार कार्ड एक ओळख पत्र आहे. हा एक यूनिक नंबर असून व्यक्तीच्या मृत्यूनंतरही तो तसाच राहतो. हा नंबर इतर कोणालाही दिला जाऊ शकत नाही. मृत्यूनंतर आधारचं काय होतं या संदर्भात सरकारने स्वत: संसदेत सांगितलं, की कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार डिअॅक्टिवेट करता येणार नाही. अशी कोणतीही तरतूद नाही.

  हे वाचा - लहान मुलांना Bike वरुन घेऊन जाता? आता हे नियम न पाळल्यास भरावा लागेल दंड

  आधार कार्ड डेथ सर्टिफिकेटशी लिंक - मृत व्यक्तीचं आधार कार्ड डिअॅक्टिवेट करण्यासाठी सध्या कोणतंही सिस्टम नाही. परंतु एकदा या प्रोसेसचं फ्रेमवर्क तयार झाल्यानंतर रजिस्ट्रार मृत व्यक्तीचं आधार निष्क्रिय करण्यासाठी UIDAI सह सुरू केलं जाईल. आधार कार्ड डेथ सर्टिफिकेटशी लिंक केल्यानंतर याचा चुकीचा उपयोग केला जाऊ शकत नाही.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Aadhar card, Aadhar card link, Pan card, Tech news

  पुढील बातम्या