नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : देशभरात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेकांना सुट्ट्यांमध्ये बाहेर जाताना किंवा कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर बंद घर पाहून घरात चोरी तर होणार नाही ना याची भिती असतेच. परंतु काही जबरदस्त मोबाइल Apps द्वारे तुम्ही तुमच्या घरावर (Home Security Mobile Apps) दूर राहूनही लक्ष ठेवू शकता. तुम्हीही तुमच्या घराबाबत अशारितीने चिंतीत असाल, घराबाहेर पडताना घरात चोरी होण्याची भिती वाटत असल्यास काही सीसीटीव्ही मोबाइल अॅप्स (CCTV Mobile Apps) तुमच्यासाठी फायदेशीर, मदतशीर ठरू शकतात. याच्या मदतीने तुम्ही कुठेही बसून घराच्या सुरक्षेवर लक्ष ठेवू शकता. घर सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला केवळ एक मोबाइल फोन आणि काही मोबाइल अॅप्सची गरज असेल. आल्फ्रेड होम सिक्योरिटी कॅमेरा (Alfred CCTV Camera for Home) - अनेक अॅवॉर्ड्स मिळालेलं हे सिक्योरिटी App घराच्या सुरक्षेसाठी फायदेशीर मानलं जातं. हे मोबाइल App रिमोट अॅक्सेस, लाइव्ह व्हिडीओ आणि झूमसारख्या फीचर्ससह येतं. यात काही स्टोरेज कॅपॅसिटीही मिळते, ज्याद्वारे तुम्ही रेकॉर्डिंग्स सेव्ह करू शकता. तसंच मोशन डिटेक्शन फीचरही मिळतं. या App चं एक फ्री आणि एक पेड असे दोन वर्जन आहेत.
हे वाचा - याठिकाणी WhatsApp वर अशी इमोजी पाठवली तर थेट तुरुंगवारी! होऊ शकतो 20 लाखांचा दंड
आयपी वेबकॅम (IP Webcam) - हे Security App विना इंटरनेटही वापरता येतं. या App मध्ये वेब ब्राउजर किंवा VLC App वर व्हिडीओ पाहू शकता. App ला टू-वे ऑडिओ सपोर्ट दिला असल्याने दुसऱ्या फोनवरुनही बोलता येऊ शकतं. लो बॅटरी लेवल, मोशन डिटेक्शन सारखे फीचर्स यात आहेत. याचं एक प्रीमियम वर्जनही आहे.
हे वाचा - eKYC Update साठी कॉल, मेसेज आला? सावध व्हा, एका सेकंदात रिकामं होईल बँक अकाउंट
वॉर्डनकॅम (Home Security Camera WardenCam) - मोबाइल डेटा (Mobile Data) आणि वायफाय (WiFi) अशा कोणत्याही नेटवर्कवर काम करणारं हे App तुम्हाला गुगल ड्राइव्ह (Google Drive) आणि ड्रॉप बॉक्ससारख्या Apps ला सपोर्ट करतं. यात टू-वे ऑडिओ, मोशन डिटेक्शनसारखे फीचर्स मिळतात. या App च्या युजर इंटरफेसचाही वापर करणं अतिशय सोपं आहे.