मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /'एसएमएस'साठी नवे नियम; काय आहे SMS Scrubbing? तुम्हाला कसा होणार फायदा

'एसएमएस'साठी नवे नियम; काय आहे SMS Scrubbing? तुम्हाला कसा होणार फायदा

टेलिकॉम कंपन्यांकडून एका आठवड्यासाठी एसएमएस (SMS) स्क्रबिंग निलंबित केल्यानंतर, आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने, ही सुविधा बुधवारपासून पुन्हा सुरू होणार असल्याचं सांगितलं.

टेलिकॉम कंपन्यांकडून एका आठवड्यासाठी एसएमएस (SMS) स्क्रबिंग निलंबित केल्यानंतर, आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने, ही सुविधा बुधवारपासून पुन्हा सुरू होणार असल्याचं सांगितलं.

टेलिकॉम कंपन्यांकडून एका आठवड्यासाठी एसएमएस (SMS) स्क्रबिंग निलंबित केल्यानंतर, आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने, ही सुविधा बुधवारपासून पुन्हा सुरू होणार असल्याचं सांगितलं.

नवी दिल्ली, 16 मार्च : टेलिकॉम कंपन्यांकडून एका आठवड्यासाठी एसएमएस (SMS) स्क्रबिंग निलंबित केल्यानंतर, आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने, ही सुविधा बुधवारपासून पुन्हा सुरू होणार असल्याचं सांगितलं. टेलिकॉम कंपन्या ट्रायच्या आदेशानुसार स्क्रबिंग प्रोसेस लागू करतात. स्क्रबिंग प्रक्रियेअंतर्गत प्रत्येक SMS युजरपर्यंत पोहचण्याआधी रजिस्टर्ड टेंम्प्लेटशी वेरिफाय केला जातो. DLT ब्लॉकचेनवर आधारित एक रजिस्ट्रेशन सिस्टम आहे आणि ट्रायने सर्व टेलिमार्केटर्ससाठी DLT प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य केलं आहे. या मागचा उद्देश हा आहे की, टेलिमार्केटर्सकडून SMS स्पॅमवर लगाम लावणं.

स्पॅम मेसेज आणि ऑनलाईन फ्रॉडवर लगाम घालण्यासाठी नवीन SMS रेग्लुलेशन करण्यात आल्याचं TRAI ने सांगितलं. तसंच ज्या कंपन्यांनी या रेग्लुलेशनला अद्याप फॉलो केलं नाही त्यांना तीन दिवसांचा वेळ देण्यात आला होता, जेणेकरुन ते नव्या नियमांनुसार रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करू शकतील. परंतु आता सध्या कंटेन्ट टेंम्प्लेट रजिस्टर्ड असो किंवा नको, ट्रायने SMS ग्राहकांपर्यंत पोहचवण्याची परवानगी दिली आहे.

ट्रायच्या या नव्या नियमांमुळे OTP आणि SMS येण्यास समस्या येत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर, कंपन्यांना नवीन नियम फॉलो करण्यासाठी 7 दिवसांचा वेळ देण्यात आला. TRAI ने जुलै 2018 मध्ये स्पॅम मेसेजपासून सुटका होण्यासाठी, विना रजिस्टर असलेल्या सेंडरला कमर्शियल मेसेज पाठवण्यासाठी SMS Scrubbing नियम बनवण्यात आला. जो 8 मार्चपासून लागू करण्यात आला.

SMS येण्यास आलेल्या अडथळ्यांमुळे बँका, ई-कॉमर्स आणि इतर कंपन्यांना SMS येण्यास अतिशय वेळ लागत होता. ही समस्या एकाच नेटवर्कसाठी नव्हती तर सर्वच ठिकाणी येत होती.

(वाचा - Covid-19 Vaccination: लसीकरणासाठी घरबसल्या करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन; बुक करा स्लॉट)

काय आहे SMS Scrubbing?

प्रत्येक SMS कंटेट पाठवण्यापूर्वी त्याच्या होणाऱ्या वेरिफिकेशनच्या प्रोसेसला स्क्रबिंग म्हणतात. दिल्ली हाय कोर्टाने टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया अर्थात TRAI ला आदेश दिले होते की, त्वरित खोट्या-फ्रॉड SMS वर बंदी घालावी, ज्यामुळे सामन्य लोकांची फसवणूक होणार नाही. कोर्टाचा हा आदेश पूर्ण करण्यासाठी TRAI ने DLT सिस्टम सुरू केली. नव्या DLT सिस्टममध्ये रजिस्टर्ड टेंम्प्लेटवाल्या प्रत्येक SMS च्या कंटेटला वेरिफाय केल्यानंतरच तो डेलिव्हर केला जाईल. याच संपूर्ण प्रक्रियेला स्क्रबिंग म्हणतात. ही सिस्टम यापूर्वीही अनेकदा लागू करण्याचा प्रयत्न केला गेला होता.

(वाचा - तो शेर तर तुम्ही सव्वाशेर! या चुका टाळल्यात, तर कधीच होणार नाही ऑनलाईन फसवणूक)

8 मार्चला नेमकं काय झालं -

दरम्यान, देशभरात सोमवारी लाखो नागरिकांनी एसएमएस (SMS) आणि ओटीपी (OTP) मिळण्यास उशीर होत असल्याचा किंवा एसएमएस येतच नसल्याचा अनुभव आला. त्यामुळे सगळीकडे अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला होता. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड पेमेंट्स, ई-कॉमर्स सर्व्हिसेससह कोविड लसीसाठी आवश्यक असणाऱ्या को-विन वरील (Co-Win) नोंदणी सेवादेखील यामुळे ठप्प झाली होती. त्यामुळे लाखो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

सोमवारी सकाळपर्यंत 40 टक्के एसएमएस आणि ओटीपी सेवा विस्कळीत झाली होती. यामागे कोणताही घातपात किंवा अपघात नव्हता, तर टेलिकॉम कंपन्यांनी व्यावसायिक जाहिरातींच्या एसएमएसबाबतच्या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू केली असल्यानं, त्याचा परिणाम एसएमएस सेवेवर झाला होता.

(वाचा - ...तर नुकसान भरपाईची जबाबदारी बँकेची नाही; कोर्टानंही बँक ग्राहकांना ठणकावलं)

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायनं (TRAI-Telecom Regulatory Authority of India) दूरसंचार ऑपरेटर्सना (Telecom Operators) ग्राहकांना पाठवण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या बल्क एसएमएसबाबत लागू करण्यात आलेल्या निकषांची अंमलबजावणी करण्यास सांगितलं असल्याने त्याचा फटका ओटीपी पाठवण्यासाठी आवश्यक असलेल्या एसएमएस सेवेलाही बसला. लाखो ग्राहकांना बँकेचे व्यवहार करताना ओटीपी मिळू शकले नाहीत, त्यामुळे बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झाले होते.

First published:

Tags: Otp, SMS, Tech news, Technology