मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /...तर नुकसान भरपाईची जबाबदारी बँकेची नाही; कोर्टानंही बँक ग्राहकांना ठणकावलं

...तर नुकसान भरपाईची जबाबदारी बँकेची नाही; कोर्टानंही बँक ग्राहकांना ठणकावलं

एटीएमद्वारे फसवणूक झालेल्या एका पीडितेला नुकसान भरापाई देण्यास नकार दिला आहे. फसवणूक त्या व्यक्तीच्या स्वत:च्या चुकीमुळे झाली आहे. त्यामुळे बँकची यात कोणतीही जबाबदारी नाही, असं सांगण्यात आलं आहे.

एटीएमद्वारे फसवणूक झालेल्या एका पीडितेला नुकसान भरापाई देण्यास नकार दिला आहे. फसवणूक त्या व्यक्तीच्या स्वत:च्या चुकीमुळे झाली आहे. त्यामुळे बँकची यात कोणतीही जबाबदारी नाही, असं सांगण्यात आलं आहे.

एटीएमद्वारे फसवणूक झालेल्या एका पीडितेला नुकसान भरापाई देण्यास नकार दिला आहे. फसवणूक त्या व्यक्तीच्या स्वत:च्या चुकीमुळे झाली आहे. त्यामुळे बँकची यात कोणतीही जबाबदारी नाही, असं सांगण्यात आलं आहे.

नवी दिल्ली, 16 मार्च : बँक खात्यातून वापरकर्त्याने पैसे न काढताच कट झाल्यास, अशा फ्रॉडसाठी (Bank fraud) बँक दोषी नसेल. अशा चुका वापरकर्त्याकडून (Consumer) होत असल्याने त्याच्या नुकसानीच्या भरपाईसाठी बँक जबाबदार असणार नाही, असा आदेश गुजरातच्या अमरेली ग्राहक कोर्टाने (Consumer Court of Gujarat) जारी केला आहे.

अमरेलीमध्ये ग्राहक विवाद निवारण आयोगाने (Consumer Disputes Redressal Commission Amreli) एटीएमद्वारे फसवणूक झालेल्या एका पीडितेला नुकसान भरापाई देण्यास नकार दिला आहे. या पीडितेसह 41,500 रुपयांचा फ्रॉड झाला होता. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कोर्टाने याप्रकरणात सांगितलं की, फसवणूक त्या व्यक्तीच्या स्वत:च्या चुकीमुळे झाली आहे. त्यामुळे बँकची यात कोणतीही जबाबदारी नाही.

NCDRC ने बँकांनाही जबाबदार ठरवलं होतं -

आधीच्या एका प्रकरणात राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC, एनसीडीआरसी) अनधिकृत व्यवहाराच्या बाबतीत बँका त्यांच्या ग्राहकांना पैसे देण्यास जबाबदार आहेत असं म्हटलं होतं. NCDRC च्या मते, बँका फ्रॉड झाल्यानंतर ग्राहकाला भरपाई देण्यापासून बचाव करण्यासाठी नियम आणि अटींचा आधार नाही घेऊ शकत.

तर भारतीय रिजर्व्ह बँकेनुसार, जर पैशांचा व्यवहार तिसऱ्या व्यक्तीच्या उल्लंघनामुळे झाला असेल आणि ग्राहकाने तीन दिवसांच्या आत बँकेला याबाबत सूचना दिल्यास, ग्राहक जबाबदार ठरत नाही.

(वेळ - ड्रायव्हिंग लायसन्ससह वाहन नोंदणीबाबत मोठी बातमी; भरावा लागू शकतो दंड)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सेवानिवृत्त शिक्षक कुर्जी जाविया यांना 2 एप्रिल 2018 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचा व्यवस्थापक असल्याचं सांगत एका व्यक्तीने भेटण्यासाठी बोलावलं होतं. त्यांना भेटणाऱ्या व्यक्तीने जाविया यांच्या एटीएम कार्ड्सचे डिटेल्स मागितले. जाविया यांनीही त्या व्यक्तीला तो बँक व्यवस्थापक आहे असं समजून ATM डिटेल्स दिले. त्याच्या दुसऱ्या दिवशी जाविया यांच्या खात्यात 39,358 रुपये पेन्शन आलं. आणि त्याचवेळी त्यांच्या खात्यातून 41,500 रुपये उडाले. त्यांनी बँकेत फोन केला, परंतु बँकेतून त्यांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. त्यानंतर काही दिवसांनी समजलं की, फसवणूक करणाऱ्यांनी पैशांचा वापर ऑनलाईन शॉपिंगसाठी केला होता.

जाविया यांच्या मते, बँकेने त्वरित कारवाई केली असती, तर नुकसान रोखता आलं असतं. आणि त्याचआधारावर त्यांनी एसबीआय विरोधात याचिका दाखल केली.

(वाचा - नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी तपासणं आवश्यक; सरकारकडून महत्त्वाची माहिती)

या प्रकरणात बँक दोषी का नाही?

कोर्टाने सांगितलं की, बँक आपल्या ग्राहकांना आपले एटीएम डिटेल्स किंवा बँक खात्याचे डिटेल्स कोणत्याही व्यक्तीशी शेअर न करण्याचा वेळोवेळी इशारा देते. बँकेने केवळ नोटिस बोर्डवरच याबाबत माहिती दिली नसून, याबाबतचे मेसेजही बँकेकडून ग्राहकांना पाठवले जातात. बँकेतला कोणताही कर्मचारी, ग्राहकाकडे कधीही एटीएम कार्ड डिटेल्स मागत नाही.

परंतु याचिकाकर्त्या जाविया यांनी तेच केलं, जे बँकेकडून करू नका असं सांगितलं जातं. याचाच अर्थ जाविया यांच्या बेजबाबदारपणामुळे, दुर्लक्षामुळेच हा फ्रॉड घडला असून यात बँकेची चूक नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळेच त्यांना या प्रकरणात कोणतीही भरपाई देण्यात नकार देण्यात आला आहे.

First published:

Tags: Online crime, SBI